कवलापुरात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:29 AM2021-01-19T04:29:11+5:302021-01-19T04:29:11+5:30

कवलापुरात मागील निवडणुकीत काॅँग्रेस, राष्ट्रवादीप्रणीत पॅनलने भाजपप्रणीत पॅनलला धोबीपछाड केले होते. त्यावेळी निवासबापू पाटील, भानुदास पाटील आणि विजय पाटील ...

Mahavikas Aghadi's resounding victory in Kavalapur | कवलापुरात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

कवलापुरात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

Next

कवलापुरात मागील निवडणुकीत काॅँग्रेस, राष्ट्रवादीप्रणीत पॅनलने भाजपप्रणीत पॅनलला धोबीपछाड केले होते. त्यावेळी निवासबापू पाटील, भानुदास पाटील आणि विजय पाटील एकत्र होते. मागील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कॉँग्रेस नेते निवासबापू पाटील, विजय ऊर्फ बजरंग पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपप्रणीत पॅनलचे त्यांनी यावेळी नेतृत्व केले. मात्र त्यांचा पक्षबदल मतदारांनी झिडकारला. दुसरीकडे काॅँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी एकदिलाने मतदारांना सामोरी गेली. तंटामुक्तीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांनी या पॅनलचे नेतृत्व केले. त्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती सदाशिव खाडे, जिल्हा विद्यार्थी कॉँग्रेसचे अध्यक्ष सौरभ पाटील, शिवसेनेचे प्रदीप जाधव यांची साथ लाभली.

चौकट

किंगमेकर माळकर !

कवलापुरात संतोष आणि राहुल या माळकर बंधूंची स्थानिक राजकारणात भूमिका महत्त्वाची ठरते, हेही अधोरेखीत झाले. आघाडीच्या या यशात त्यांचीही कामगिरी मोलाची असल्याचे मतांच्या आकडेवारीने सिद्ध केले.

कॉँग्रेसला मिळाला नवा, उमदा चेहरा

निवासबापू पाटील यांनी कॉँग्रेसची साथ सोडल्याने गावात कॉँग्रेसला सर्वमान्य नेतृत्वाच्या चेहऱ्याची गरज होती. जिल्हा विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सौरभ पाटील यांच्या रुपात कॉँग्रेसला आश्वासक, उमदा चेहरा या निवडणुकीने दिला. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा निकटवर्तीय,विश्वासू कार्यकर्ता म्हणून सौरभ पाटील यांनी अल्पावधीत ओळख निर्माण केली आहे. राजकारणातील पहिल्याच एंट्रीत ते निवडून आले.

Web Title: Mahavikas Aghadi's resounding victory in Kavalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.