शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:08 IST

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले.

जत : कर्नाटकने जतला कधीही पाणी दिले नाही. पावसाचे पडलेले पाणी नैसर्गिकरीत्या जत तालुक्यात आले म्हणजे जतला आम्हीच पोसतो असे होत नाही. जत तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला नाही, त्याची नोंद कुठेही नाही. असे असताना ४० गावांवर दावा करणे म्हणजे केवळ स्टंट आणि दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले. एकीकडे बेळगाव, निपाणी, कारवार भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. त्यांचे समाधान कर्नाटक करू शकले नाही. मग आता जतची चाळीस गावे घेऊन काय साध्य करणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.ते म्हणाले, जत तालुक्यावर विकास आणि पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला ही बाब खरी आहे, म्हणून काय आम्ही आमचे राज्य सोडणार नाही. आम्ही आमच्याच राज्याकडे पाणी व विकासासाठी मागणी मांडत आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही जत तालुक्याला म्हैसाळचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी प्रस्तावित असलेल्या विस्तारित योजनेचा प्रश्न सुटत नाही. यासाठी आम्ही पुढाकार घेऊन विस्तारित योजना तयार केली.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्त्वत: मंजुरी दिली. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केवळ सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले. यापेक्षा जास्ती काहीच झाले नाही. ही मोठी खंत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कर्नाटकच्या या स्टंटबाजीवर विचार न करता जतला वरदान ठरणारी विस्तारित योजना मंजूर करावी. आम्ही महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, जाण्याचा प्रश्न नाही, बोम्मई यांनी केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. त्यात तथ्य नाही. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली