शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, कर्नाटकची बस म्हैसाळजवळ फोडली, कर्नाटकने महाराष्ट्राच्या बसेस रोखल्या

By अशोक डोंबाळे | Updated: November 26, 2022 13:22 IST

कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत.

सांगली : जत पूर्व भागाच्या गावावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. याचा फटका दोन्ही राज्याच्या एसटी बसेस आणि प्रवाशांना बसताना दिसत आहे. काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाच्या अथणी ते पुणे बस क्रमांक (केए२३/एफ १००४) या बसची अज्ञाताने दगडफेक करुन काच फोडली. यामुळे कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामधील वाद टोकाला गेला आहे. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री रात्रीच्या सुमारास कर्नाटक बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बसच्या पुढील काचेवर दगड मारला.बसवरील हल्यानंतर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातून सांगली, मिरज आगारातून अथणी, कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाडजवळ रोखल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक