शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra budget 2023: सांगलीत अण्णा भाऊ साठे, देशमुखांच्या स्मारकांसाठी 45 कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:02 IST

जिल्ह्याला भरीव स्वरूपाचे अन्य काहीही मिळाले नाही.

सांगली : राज्याच्या अर्थसंकल्पात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकांसाठी निधीची घोषणा  करण्यात आली. याशिवाय सांगलीतील नाट्यगृहाव्यतिरिक्त जिल्ह्याला भरीव स्वरूपाचे अन्य काहीही मिळाले नाही.वाटेगाव (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी २५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  सध्या वाटेगावात छोटे स्मारक आहे, पण ते गोदामासारखे बांधल्याची टीका दलित महासंघाने केली आहे. छोटी इमारत, त्यासमोर चबुतऱ्यावर अर्धपुतळा असे स्मारकाचे स्वरुप आहे. १९९५ मध्ये भाजप-सेना युती सरकारच्या काळात बांधले होते. अण्णा भाऊंच्या जयंती, पुण्यतिथीला अभिवादनासाठी तेथे गर्दी होते.२०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनीही वाटेगावमधील अण्णा भाऊंच्या वास्तव्याची ठिकाणे नीटनेटकी करण्याची घोषणा केली होती. मुंबईत त्यांचे वास्तव्य असलेल्या जागी स्मृतिभवन उभारण्यात येणार असून, तेथेच त्यांच्या मुलींना घर बांधून देणार असल्याचे सांगितले होते. वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासासाठीही ५० लाख रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे. अखेर गुरुवारी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने अण्णा भाऊंच्या चाहत्यांतून समाधान व्यक्त होत आहे.वाटेगावात होणार कामेवाटेगाव येथील स्मारकामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच परिसर सुशोभिकरण करणे, परिसरात सोयी सुविधा पुरवणे, स्मारकाकडे येणारे सर्व रस्ते नूतनीकरण करणे, काँक्रिटीकरण, आरसीसी गटर बांधणे, फूटपाथ तयार करणे अशी कामे २५ कोटी रुपयांच्या निधीतून होणार आहेत.शिवाजीराव देशमुख यांच्या योगदानाचे स्मरणविधान परिषदेचे सभापती म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचे स्मरण म्हणून कोकरुड (ता. शिराळा) येथे स्मारक उभारले जाणार आहे.काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक म्हणून  देशमुख यांच्या स्मारकासाठी भाजपच्या सत्तेत निधीची तरतूद व्हावी, यामागील राजकीय गणितही महत्त्वाचे आहे. सध्या भाजपमध्ये असणारे त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांची मर्जी राखण्यासाठीही ही तरतूद असू शकते. 

टॅग्स :SangliसांगलीMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023