शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निकाल धक्कादायक, अविश्वसनीय; ईव्हीएममध्ये गोंधळाची शंका - विश्वजित कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:25 IST

पलूस : विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. ईव्हीएममध्ये खरोखरच काही गोंधळ आहे का? अशी शंका येण्यासारखी ...

पलूस : विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. ईव्हीएममध्ये खरोखरच काही गोंधळ आहे का? अशी शंका येण्यासारखी स्थिती असल्याचे मत पलूस - कडेगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व क्रांती साखर कारखान्यातर्फे डॉ. कदम यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कदम यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेली जनता विधानसभेतही महाविकास आघाडीला यश देईल असे वाटत होते; मात्र निकाल आश्चर्यकारक व धक्कादायक आहे. काही वर्षांपूर्वी पुरोगामी व काँग्रेसवादी विचारसरणीच्या नेत्यांनी ईव्हीएम हटाव, देश बचाव अशी चळवळ उभी केली होती. कालच्या निकालानंतर ईव्हीएममध्ये खरेच काही गोंधळ आहे का? अशी शंका येत आहे.कदम म्हणाले, पुरोगामी विचारधारेवर जातीयवादी शक्तींचे आक्रमण झाले आहे. जातीयवादी लोक दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्रात धनशक्तीचा प्रचंड वापर होऊ लागल्याने लोकांना अशा शक्तीपासून वाचविण्याची गरज आहे. तरुणांत नैतिक व पुरोगामी विचार पेरण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून एकत्रित येऊन अशा शक्तींना पराभूत करु. आमदार अरुण लाड म्हणाले, कालच्या निकालावरून हे असे का होत आहे याचे कोडे पडले आहे. लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीने दिशा बदलली. लोकांना जे नको आहे, तिकडे नेण्याचा प्रयत्न केला.शरद लाड म्हणाले, पलूस-कडेगावची जनता भाजपच्या फसव्या योजना व फसव्या प्रचाराला बळी पडली नाही. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन काम केल्याने यश मिळाले आहे.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते.

प्रेमाची परतफेड दुपटीनेडॉ. विश्वजीत कदम म्हणाले, विधानसभेचा निकाल काहींना रूचला, काहींना रुचला नाही. मात्र यापुढे कोणाच्याच मनात चुकीचा विचार किंवा चुकीचे राजकारण येता कामा नये. कदम यांना प्रेम दिले की ते दुप्पट प्रेम देतात. सत्ता नसली तरी आता आपण थांबायचे नाही. लोकांची ताकद आपल्याकडे आहे. त्यांना सोबत घेऊन मुख्य प्रश्नांसाठी लढू. मतदारसंघाच्या विकासासाठी लाड व कदम कुटुंबीय एकजुटीने, एकदिलाने यापुढे काम करतील. शरद लाड व आमदार अरुण लाड यांचे व कार्यकर्त्यांचे ऋण कायम राहील.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Vishwajeet Kadamविश्वजीत कदमEVM Machineईव्हीएम मशीनwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024