शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
4
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
5
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
6
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
7
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
8
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
9
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
10
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
11
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
13
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
14
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
15
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
17
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
18
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
19
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
20
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

‘मिरज पॅटर्न’ चौथ्यांदा चालेल?; सुरेश खाडेंचा विजयाचा वारू रोखण्यासाठी उद्धवसेनेचे तानाजी सातपुते मैदानात

By हणमंत पाटील | Updated: November 6, 2024 16:05 IST

उद्धवसेनेचे तानाजी सातपुते यांच्याशी लढत

हणमंत पाटीलसांगली : महायुतीचे उमेदवार व भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे मिरज राखीव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न चार पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे. या निवडणुकीत सुरेश खाडे यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना मैदानात उतरविले आहे.सांगली जिल्ह्यातील आठपैकी जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे पहिल्यांदा जतमधून जिल्ह्यात भाजपचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जतऐवजी शेजारचा मिरज हा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा भाजपचे सुरेश खाडे मिरज मतदारसंघातून निवडून आले. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत चौथ्यांदा ते मिरजेतून मैदानात उतरले आहेत.लोकसभा, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते कोणाच्याही मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, नगरसेवक व कार्यकर्ते त्यांना विधानसभा निवडणुकीत मदत करीत असल्याचा मिरज पॅटर्नचा फंडा प्रत्येक निवडणुकीला त्यांच्या मदतीला येतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते रिंगणात उतरले आहेत. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते किती मदत करतात, यावर खाडे विरुद्ध सातपुते या लढतीच्या विजयाची समीकरणे ठरणार आहेत.

जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचा कोणाला फायदा ?मिरज विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती-जमाती, मराठा, ब्राह्मण, तसेच, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध व शीख अशा विविध जातिधर्मांचे मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका व फायदा कोणाला होईल, यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.

लोकसभेला काय घडले, त्याचा परिणाम काय ?लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघातून २४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे संजयकाका पाटील यांना मिळाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मिळाली होती.मिरज मतदारसंघातून विशाल पाटील यांना एक लाख ९ हजार ११० मते मिळाली. त्यानंतर संजय पाटील यांना ८४ हजार २९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील यांना ८ हजार २१ मते मिळाली होती.

  • एकूण मतदार : ३,३०,९६६
  • पुरुष : १,६७,०९२
  • स्त्री : १,६३,८४८

सन २०१९ मध्ये काय घडले?सुरेश खाडे भाजप (विजयी) ९६,३६९बाळासाहेब होनमोरे स्वाभिमानी शेतकरी पक्ष ६५,९७१

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?वर्ष - विजयी उमेदवार - पक्ष - मते

  • २००९ - सुरेश खाडे - भाजप - ९६,४८२
  • २०१४ - सुरेश खाडे - भाजप - ९३,७९५
  • २०१९ - सुरेश खाडे - भाजप - ९६,३६९

निवडणुकीतील कळीचे मुद्दे..

  • ‘आरोग्यपंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील प्रसिद्ध मिशन रुग्णालय (वानलेस) डबघाईला आले आहे. मतदारसंघातील कामगारमंत्री असूनही या मिशन रुग्णालयातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही.
  • सलग तीन वेळा निवडून येऊनही मिरज मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, गटारी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत.
  • मिरज शहरात विकास आराखड्याची (डीपी) अंमलबजावणी झाली नसल्याने नियोजनबद्ध विकास झालेला नाही.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024