शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार

By अविनाश कोळी | Updated: November 26, 2024 18:01 IST

सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम शक्य

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे वर्चस्व वाढत असताना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरूज ढासळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे. नवे चेहरेही राजकारणात येत असल्याने राजकारणाच्या कार्यपद्धतीतही बदल दिसू शकतो.जिल्ह्यात महायुतीचे पाच व महाविकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीकडे पाच व महायुतीकडे तीन आमदार होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते. आता पुढील पाच वर्षांत महायुतीचे वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत.जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. पर्यायाने विकासकामे, निधी खर्चाच्या बाबतीतही महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता यासाठी संघर्ष करावा लागेल. केंद्रात व राज्यातही भाजप युतीचे सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्येही स्थानिक आमदारांचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. आमदारकी गेली, तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभा निकालाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून, तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात बाहुबल सिद्ध केले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागेल.

नेत्यांमधील संघर्ष वाढणारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राजकीय व्यासपीठावरील ही लढाई आता विधानसभेतही दिसून येईल.

युवा नेत्यांच्या हाती दोरजिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीला आता रोहित पाटील, सुहास बाबर, सत्यजीत देशमुख, असे नवे युवा चेहरे दिसणार आहेत. जिल्ह्यातील राजकारणाचे दोरही काही प्रमाणात या युवा नेत्यांच्या हाती गेले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय कार्यपद्धतीचे दर्शनही घडू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024