शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

सांगली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात तिरंगी लढत; कुणाचे गणित बिघडविणार ?..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:20 IST

आजपासून प्रचार सभा, बैठकांचा धुरळा

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार सभा व बैठकांचा धुरळा उडवून दिला आहे. काँग्रेस व भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभाही येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सांगली, जत, खानापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरांने तिरंगी लढत, तसेच उर्वरित पाच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज माघारीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात ९९ उमेदवार उतरले आहेत. यामध्ये शिराळा, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ व मिरज अशा पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विरोधात महायुती असा थेट सामना रंगणार आहे. शिराळ्यातील भाजपचे बंडखोर सम्राट महाडिक यांनी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक व भाजपचे सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत आहे.

इस्लामपुरात आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील, तर पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख अशी थेट लढत आहे. तासगाव-कवठमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी दंड थोपटले आहेत. मिरजेत भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात उद्धवसेनेचे तानाजी सातपुते यांनी आव्हान उभा केले आहे.

राजेंद्र देशमुख कुणाचे गणित बिघडविणार ?खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये राजेंद्र देशमुख हे अपक्ष उमेदवारी लढवून २० हजार २९० मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यांनी तत्कालीन आमदार अनिल बाबर यांचा पराभव केला होता. यावेळी ॲड. सदाशिवराव पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. २९ वर्षांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी करून निवडणूक मैदानात शड्डू ठोकला आहे. पण, यावेळी त्यांच्यासमोर शिंदेसेनेकडून सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील यांचे आव्हान आहे.

सांगली विधानसभेत तिरंगीसांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी दुरंगी लढत होती. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी अर्ज ठेवल्याने तिरंगी लढत होणार आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याचीच सांगली शहरामध्ये चर्चा रंगली आहे. या प्रमुख तीन उमेदवारांसह १४ उमेदवार रिंगणात असल्याचा कुणाला फटका बसणार, याचेही गणितही राजकीय जाणकार मांडत आहेत.

जतमधील आमदारांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्षकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता होती. पण, भाजपच्या पक्षश्रेष्ठींची शिष्टाई निष्फळ ठरल्याने तम्मनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी कायम ठेवत रिंगणात उतरले आहेत. यामुळे जतमधील लक्षवेधी लढतीकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीjat-acजाटkhanapur-acखानापूरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024