शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Assembly Election 2019 :तासगावात आमदार, कवठेमहांकाळला सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:24 IST

आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली.

ठळक मुद्देMaharashtra Assembly Election 2019 :तासगावात आमदार, कवठेमहांकाळला सरकारतासगाव-कवठेमहांकळ मतदारसंघातील गावांना थेट भेट

दत्त पाटीलकवठेमहांकाळ  -आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांची, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे सरकारांची हवा असल्याचे दिसून नेते. वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न आणि नेत्यांचा जनसंपर्क, हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या पश्चात पहिल्यांदाच आबा गट विरोधकांशी दोन हात करत स्वत:ची ताकद अजमावत आहे.कदाचित ही निवडणूक सुमनतार्इंसाठी शेवटची ठरणारी असली तरी, युवा नेते रोहित पाटील यांचा राजकीय पाया निश्चित करणारी ठरणार आहे. अखेरच्याक्षणी भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री अजितराव घोरपडे शिवसेनेकडून रिंगणात उतरले. राजकीय मर्यादा असल्याने भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर भिस्त ठेवून त्यांनी शड्डू ठोकला.तासगाव तालुक्यातील बहुतांश गावात आमदार सुमनतार्इंची हवा असल्याचे दिसून आले. पाच वर्षात आमदार सुमनतार्इंकडून झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे यंदा त्याच असल्याचे मतदारांकडून सांगितले जात आहे. यंदा आमच्याकडं आबाचंच वारं दिसतंय. घोरपडे सरकार इकडं कधी फिरकलं नाहीत. त्यामुळं इकडं ते जास्त चालणार न्हाईत. असं सिध्देवाडीचे आण्णू पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, सिध्देवाडीचा मोठा तलाव हाय, पर पाणी न्हवतं. पाण्यासाठी खासदारास्नी मतं दिली. पण कुणीच पाणी दिलं न्हाय. शेवटी निसर्गानंच तलाव भरून दिलाय. आमदार सत्तेत न्हायीत, पर ज्यांच्या हातात सत्ता हाय त्यांनी बी पाणी दिलं न्हाय.तासगाव तालुक्यातून कवठेमहांकाळ तालुक्यात घाटनांद्रेत प्रवेश केला. गावातच पारावर काही मंडळींची बैठक बसली होती. टेंभूच्या पाईप लोकसभा निवडणुकीआधी येऊन पडल्यात. मात्र पाण्याचा प्रश्न मिटला नाही. गावात प्रचाराच्या गाड्या येतात, पण उमेदवार आले नसल्याचेही काहींनी सांगितले.

कुणीबी आलं तरी पाणी काय मिळत न्हायह्ण अशा मानसिकतेतून निरुत्साह असल्याचे चित्र दिसून आले. सरकार जास्त फिरकलं नाहीत, आमदारबी आल्या नाहीत. पण आबानं केलेल्या कामाच्या जोरावर आबा गटच जास्त चालंल असं पतंगराव शिंदे यांनी सांगितले.सरकार आलं तर पाणी यील, अशी प्रतिक्रिया कुंडलापूरच्या उदय पाटील यांनी दिली. कवठेमहांकाळजवळ वाटेतच शिंदेवाडीचे सरपंच भेटले. यंदा सरकारांना निवडून आणायचंच, यासाठी आम्ही तासगाव तालुका पिंजून काढला आहे. मणेराजुरीत ठाण मांडले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांचा जनसंपर्क, कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. पाटील यांनी केलेली विकासकामे आणि रोहित पाटील यांचा प्रभाव, या भरोशावर राष्टÑवादीला मतदान करणार असल्याचा सूर आहे.

दुसरीकडे खासदार आणि सरकार मिळून मतदारसंघाचा कायापालट करतील. सरकारांची आमदारकी हा कवठेमहांकाळच्या अस्मितेचा विषय आहे. या मुद्द्यावर घोरपडेंना मतदान करण्याचा सूर आहे.

टॅग्स :tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडेSangliसांगली