शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Mahaparinirvan Din 2022: सांगलीतील अमरापुरात महामानवास अनोखे अभिवादन, वह्या व पुस्तकांमधून साकारली कोलाज प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:01 IST

दोन दिवस उन्हातान्हात उभे राहून पूर्ण केली कलाकृती 

प्रताप महाडीक कडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज, मंगळवारी भारती विद्यापीठाच्या अमरापूर तालुका कडेगाव येथील अभिजीत दादा कदम प्रशाला येथे ५२० विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनातून "ग्रंथ हेच गुरु' हा संदेश दिला आहे. यावेळी ३५०० चौरस फुटामधून तब्बल ३२२१ वह्या व पुस्तकांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य अशी जगातील पहिली कोलाज प्रतिमा साकारत महामानवास अनोखे अभिवादन केले. १९०७ साली मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी त्यांना भेट म्हणून त्यांचे शिक्षक कृष्णाजी केळुस्कर यांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट दिले, हेच पुस्तक त्यांना त्यांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. रोज १८ तास अभ्यास करणारे व पुस्तकांसाठी भव्य घर बांधणाऱ्या महामानवाने आपले आयुष्य पुस्तके लिहिण्यात आणि वाचनात खर्च केले. अशा या महामानवास कलाशिक्षक नरेश लोहार यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.यासाठी कलाशिक्षक लोहार यांना विद्यालयाचे प्राचार्य डी एम मोरे, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच इयत्ता सातवी व नववीतील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य मिळाले. दोन दिवस उन्हातान्हात उभे राहून पूर्ण केली कलाकृती ही कोलाज प्रतिमा साकारत असताना कलाशिक्षक नरेश लोहार यांनी विद्यार्थ्यांसमवेत दोन दिवसात तब्बल १५ तास भर उन्हात उभे राहून ही कलाकृती परिपूर्ण केली आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी एक उत्तम कला जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगली