शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत महाआघाडी पराभूत, भाजपच्या प्राजक्ता कोरे नव्या अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:49 IST

सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत्करावा लागला.

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेत महाआघाडी पराभूत, भाजपच्या प्राजक्ता कोरे नव्या अध्यक्षशिवाजी डोंगरे उपाध्यक्षपदासाठी विजयी

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत्करावा लागला.अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्राजक्ता कोरे तर उपाध्यक्षपदासाठी शिवाजी डोंगरे यांचा अर्ज दाखल झाला तर महाविकास आघाडीकडून मांगले येथील अश्विनी नाईक यांचा अध्यक्षपदासाठी तर बोरगावचे जितेंद्र पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. भाजपला ३५ तर काँग्रेसच्या महाविकास आघाडीला २२ मते मिळाली. त्यामुळे अध्यक्ष म्हणून भाजपच्या प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवाजी डोंगरे हे विजयी झाले.जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. सध्या भाजपचे चिन्हावरील २४ आणि अपक्ष दोन अशी २६ सदस्य संख्या आहे. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रयत विकास आघाडीचे चार सदस्य भाजपबरोबरच राहिले.जगन्नाथ माळी (पेठ, ता. वाळवा) आणि निजाम मुलाणी (येलूर, ता. वाळवा) हे भाजपबरोबर राहिले. त्यामुळे भाजपकडे २८ सदस्यांचे संख्याबळ होते. माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे तीन सदस्यही भाजपसोबत राहिल्याने भाजप आघाडीला विजय मिळाला.खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचे चार सदस्य सहलीमध्ये सहभागी झाले नसल्यामुळे भाजपकडे महाडिक गटासह २४ सदस्य राहतील अशी अपेक्षा होती. पण खा. पाटील यांचीही नाराजी दूर करण्यात भाजप नेतृत्वाला यश आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली