शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीसाठी 'मविआ' विरुद्ध 'भाजप' थेट लढत

By संतोष भिसे | Updated: April 20, 2023 17:08 IST

पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यासाठी दुपारपर्यंत नेतेमंडळींचा खटाटोप

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यासाठी दुपारपर्यंत नेतेमंडळींचा खटाटोप सुरु होता.निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक विशाल पाटील गट असे जुगाड अखेर यशस्वी झाले. जयंत पाटील आणि विशाल पाटील यांची हातमिळवणी झाली. पॅनेलमध्ये कॉंग्रेसला ७  जागा, राष्ट्रवादीला ६ जागा आणि शिवसेनेला दोन जागा निश्चित करण्यात आल्या. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आणि विशाल पाटील यांनी ही घोषणा केली. भाजपची नेत्यांचीही सकाळी बैठक झाली. त्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटासह पॅनेल निश्चित करण्यात आले.महाविकास आघाडीमध्ये संग्राम पाटील, सांगलीवाडी, दादा पाटील, एरंडोली, शशिकांत नागे, आनंदराव नलवडे यांना पॅनेलमध्ये संधी मिळाली आहे. पॅनेलला वसंतदादा पाटील शेतकरी महाविकास आघाडी पॅनेल असे नाव देण्यात आले आहे. जत तालुक्याला ६, कवठेमहांकाळला ४ आणि मिरज तालुक्याला ५ जागांचा वाटप करण्यात आले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांनी सांगितले की, पॅनेल म्हणून एकत्र लढत असल्याने एकाच चिन्हाची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करणार आहोत. पॅनेलची धोरणे शेतकरी केंद्रीत आहेत. जाहिरनाम्यातही शेतकरी, निवास शेतमालालाला रास्त भाव आधी घोषणा करणार आहोत.यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक मनोज शिंदे - म्हैसाळकर, बाळासाहेब होनमोरे, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम आदी उपस्थित होते.दरम्यान, दोन्ही पॅनेलमध्ये गेल्यावेळच्या एकाची संचालकाचा समावेश नाही. अपात्र ठरलेल्या चार संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याचा निर्णयही सायंकाळपर्यंत अपेक्षित होता. व्यापारी व हमाल गटातील चित्रही दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा