शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मे. पु. ना. गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्सचे यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:48 IST

मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे जेष्ठ संचालक यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे १२ फेब्रुवारी रोजी सांगली येथे निधन झाले

सांगली : मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे जेष्ठ संचालक यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे १२ फेब्रुवारी रोजी सांगली येथे निधन झाले. ते  ८८ वर्षाचे होते. सांगली सराफ असोशिएशनचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक म्हणून सांगली शहराचे २० वर्ष काम पहात होते. टिळक स्मारक मंदिराचे ते विश्वस्थ होते. राष्ट्रीय संघटन मंडळाचे अध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, मेघालय वसतिगृह जनकल्याण समिती यांचे संचालक तसेच संघाच्या अनेक समित्यावर कार्यरत होते. सांगली शिक्षण संस्थेचे ते तर आधारस्थंभ होते. मृदुभाषिक व शांत स्वभावाचे बाबुदादा कायम सायकलवरून भ्रमंती करत असत. अफाट जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट होते. अनेक गरजूंना त्यांनी मदत केली होती. पेढीचे कामकाज ते अखेर पर्यंत पहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुमनताई गाडगीळ, चुलत बंधू आमदार सुधीरदादा,  सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशकाका, चिरंजीव मिलिंद, पराग, डॉ. अनिरुद्ध गाडगीळ, एक कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.१४ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता अमरधाम स्मशानभूमीत होईल. याच दिवशी सायंकाळी ५  वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.