शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

By संतोष भिसे | Updated: October 15, 2022 18:11 IST

जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

सांगली : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांना व शेतकऱ्यांना जनावरांच्या वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी (दि. १४) जारी केले. दरम्यान, जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.कोणत्याही तपासणीविनाच जनावरे जिल्ह्यात येऊ लागली आहेत. लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीवर शासनाने निर्बंध घातले होते, पण कारखान्यांच्या गळीतासाठी निर्बंध सध्या शिथील करण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातून ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांना सोबत जनावरे आणता येतील, शिवाय स्वत: ऊसाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.यासाठी जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र जनावरासोबत आवश्यक असेल. या नियमानंतरही जिल्ह्याच्या सीमा सताड खुल्या दिसत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या जनावरांच्या तपासणीसाठी किंवा, प्रमाणपत्र पाण्यासाठी कोणतीही यंत्रणा सीमेवर नाही. साखर कारखान्यांनी जनावरांच्या दैनंदिन तपासणी व औषधोपचारासाठी स्वतंत्र खासगी पशुवैद्यक नेमण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. राज्यात लम्पीचा उदभव व वेगाने फैलाव विदर्भातच झाला होता, त्यामुळे तेथील जनावरांना जिल्ह्यात प्रवेश देताना सतर्कतेची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणारजनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत. आंतरराज्य रस्त्यांवर नाके असतील. जनावरांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासून जिल्ह्यात प्रवेश देण्याचे काम पोलीस करतील. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सदाशिव बेडक्याळे यांनी ही माहिती दिली.

प्रत्येक जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण केले असेल, तरच जिल्ह्यात प्रवेश आहे. सीमेवर प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणा तूर्त सुरु झालेली नाही. पण साखर कारखान्यांना आवश्यक आदेश दिले आहेत. संशयास्पद तसेच लसीकरण नसलेले जनावर २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यास सांगितले आहे. साखर आयुक्तांनीही तसे आदेश काढले आहेत. - सदाशिव बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगSugar factoryसाखर कारखाने