शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शिवभक्तांनी आणली २८ फुटांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती, गुरुवारी मिरवणूक

By अविनाश कोळी | Updated: May 8, 2024 20:52 IST

संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.

मिरज : मिरजेतील ‘आम्ही शिवभक्त’ संघटनेच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणजेच तब्बल २८ फुटी शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली आहे. गुरुवारी (९ मे) मिरजेत या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरजेत शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाच्या शिवजयंतीत २८ फुटी उंच शिवरायांची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून ही मूर्ती आणण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी मिरजेत ही मूर्ती दाखल झाली आहे. गुरुवारी मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता गुजरातमधील सानंदचे आमदार कनुभाई पटेल यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. त्यानंतर साडेपाच वाजता नदीवेस कोळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री दहा वाजता शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता होईल. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी -संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.दरवर्षी आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत मोठी मिरवणूक काढण्यात येते. यंदा २८ फुटी मूर्ती आणून उत्सवात नवा रंग भरण्याचा प्रयत्न आहे. संघटनेची मिरवणूक पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी मिरज व परिसरातील ग्रामीण भागातूनही शिवभक्त गर्दी करीत असतात. यंदा मूर्ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.- विकास सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष, आम्ही शिवभक्त संघटना, मिरज.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSangliसांगली