शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

लोकसभा निकालाचे काऊंटडाऊन सुरू...: उमेदवारांची धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:40 IST

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे.

ठळक मुद्देयावेळी तिरंगी लढतीमुळे निकालातील टक्केवारीचा फरकही नगण्य असणार आहे. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातयंदा टक्केवारी वाढली गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. त्यामुळे वाढलेला हा टक्का कोणाला तारणार आणि कोणाला धक्का देणार, याचीही उत्सुकता नागरिकांत आहे.

सांगली : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून प्रमुख उमेदवारांच्या कट्टर समर्थकांनी देवाला साकडे घालण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच तिरंगी व चुरशीची लढत यंदा होत आहे. आजवर एकतर्फी किंवा दुरंगी एवढाच सामना येथील नागरिकांनी अनुभवला होता. यावेळी तीन दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशा तीन तुल्यबळ उमेदवारांचा हा सामना संपूर्ण राज्यात चर्चेचा बनला आहे.राजकीय तज्ज्ञांनाही याठिकाणचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथील निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २३ मे रोजी निकाल स्पष्ट होणार असल्याने आतापासूनच त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मतांची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, मतदारसंघनिहाय कोणाचे पारडे जड राहणार... अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ सध्या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण २0१४ मध्ये त्याला खिंडार पाडून भाजपने तो ताब्यात घेतला. मोदी लाटेचा मोठा परिणाम मागील निवडणुकीत होता. त्यामुळे यंदा भाजपचे उमेदवार व स्थानिक नेत्यांनी स्वबळावर ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यात त्यांना कितपत यश मिळणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यानंतर, या संघटनेमार्फत निवडणूक लढविली आहे. त्यामुळे प्रथमच या निवडणुकीत काँगे्रसचे अस्तित्व दिसत नाही. तरीही स्वाभिमानी, राष्टवादी, काँग्रेस यांच्यासह ५६ पक्ष, संघटनांची आघाडी असल्यामुळे विशाल पाटील यांची उमेदवारी आघाडी म्हणून पाहिली जात आहे.संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक व भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीत आलेले गोपीचंद पडळकर यांनी तिसरा पर्याय म्हणून या निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे याठिकाणची लढत अधिक रंगतदार व चुरशीची बनली आहे. येथील निकालाचे परिणाम काय राहतील, याचा अंदाज करणेही त्यामुळे कठीण बनले आहे.

समीकरणे बदलणारी : निवडणूकसांगली लोकसभा मतदारसंघातील निकालाने जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कोणत्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विजय होणार, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर त्याचा परिणाम विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवरही पाहायला मिळाला होता. तसेच परिणाम यंदाच्या निकालानंतरही पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

 

 

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलSangliसांगली