शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:50 IST

Road Sefty Shirala Sangli : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला आणि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरुठेकेदार,अभियंत्याविरोधात आवाज, लोकमतने फोडली होती वाचा

विकास शहाशिराळा  : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला आणि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.सध्या या तीव्र वळणावरील फरशी पुलाच्या उत्तरेकडील बाजूने गटाराचे बांधकाम करत तीव्र वळण कमी करण्याचे काम सध्या केले जात आहे. परंतु दक्षिण दिशेला बांधण्यात असलेल्या गटाराचे काम नियमानुसार केले नसल्याचे दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी संतप्त भावना ग्रामस्थांच्यामधून व्यक्त केली जात आहे.या तीव्र वळणावरील फरशी पुलाची रुंदी कमी असल्याने आधीच ग्रामस्थांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने त्यात काहींचे प्राणही गेले होते. त्यातच रस्त्यातून गटाराचेही बांधकाम करुन या ठेकेदाराने ग्रामस्थांनच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.कराड ते रत्नागिरी असा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वहातुक सुरू असते त्यात आता या मार्गाचे रुंंदीकरण झाल्याने वहातुकीत खूप मोठी वाढ होईल आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर शेताकडे चालणाऱ्या रहदारीला, गुरांना नदीला पाण्यासाठी घेऊन जाणारे गावकऱ्यांना व शाळेला चालत जाणाऱ्या चिमुकल्या लेकरांना या ठिकाणी भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने या तीव्र वळणाचे योग्य रुंंदीकरण होणे आवश्यक होते.सामाजिक बांधिलकीसंवेदनशील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी या फरशी पुलाला डबल नळे टाकण्यासाठी या आधीही संघर्ष केला होता. व आता हे तीव्र वळण कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करुन या वळणाचे रुंंदीकरणा करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना गावातील युवकांनी चांगली साथ दिली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSangliसांगली