शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:48 IST

नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार

श्रीनिवास नागे

सांगली : आकाशवाणीच्या सांगलीसह प्रमुख सात केंद्रांवरील सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेतील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. सव्वाचार तासांसाठी स्थानिक कार्यक्रम बंद करून ‘सांगली आकाशवाणी’चा आवाजच प्रसारभारतीने दाबला आहे. नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना याची सर्वाधिक झळ बसणार आहे.

‘एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ असे धोरण प्रसारभारतीने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी, नागपूर या प्रमुख केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित (रिले) होणार आहेत. तसे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आकाशवाणी हे लोकरंजन आणि लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात आकाशवाणीची २८ जिल्हा केंद्रे आणि वाहिन्या (प्रायमरी चॅनेल्स) आहेत. त्यावरून स्थानिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होते. स्थानिक घटना, समस्या, लोककला-संस्कृतीचा विचार करून या कार्यक्रमांची निर्मिती होते. त्यातून स्थानिक उद्घोषक-निवेदक आणि कलावंतांना संधी मिळते. संस्कृतीचे प्रादेशिक वैविध्यही जपले जाते.

पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारा मोठा श्रोतृवर्ग आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नाटिका, शेती, लोकशिक्षण आणि कामगारविषयक संवादिका, सामाजिक-कौटुंबिक श्रुतिका, अभिवाचन, बातम्या, संगीत-मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या ‘सांगली आकाशवाणी’ राज्यात अग्रेसर ठरली. आता प्रसारभारतीच्या धोरणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सव्वाचार तास तास, तर नंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरातील सर्वच स्थानिक कार्यक्रम बंद होतील.त्याऐवजी राज्यातील एकाच प्रमुख (मुंबई) केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याचा सर्वात मोठा फटका नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना बसणार आहे. नैमित्तिक उद्घोषकांना तीनऐवजी दोनच पाळ्यांमध्ये काम मिळेल. स्थानिक कलाकारांना संधी मिळणार नाही.

धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगलीसाठी आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणले. ६ ऑक्टोबर १९६३ रोजी या केंद्रावरून प्रक्षेपण सुरू झाले. नाट्यपंढरीतील या केंद्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. कल्पक अधिकारी, हरहुन्नरी स्थानिक कलावंत, आवाजावर हुकूमत असणारे उद्घोषक-निवेदक, कार्यक्रमांतील वैविध्य यामुळे सर्वदूर महती पोहोचली. मात्र प्रसारभारतीच्या धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे सांगली केंद्राच्या सुस्पष्ट ‘आवाजा’ला खरखर लागली...

टॅग्स :Sangliसांगली