शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 19:47 IST

संथ वाहते कृष्णामाई, तिरावरल्या सुख-दु:खाची जाणीव तिजला नाही, अशी संथ वाहणाऱ्या सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे.

ठळक मुद्दे कृ ष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा

संजयनगर : संथ वाहते कृष्णामाई, तिरावरल्या सुख-दु:खाची जाणीव तिजला नाही, अशी संथ वाहणाऱ्या सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. या ठिकाणी पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवणार आहेत.

नदीकाठच्या अनेक गावांचे व शहरातील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. नदीच्या पाण्याचा वासही उग्र येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शुक्रवारी नदी पात्रातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.कृष्णा नदीचा उगम वाई तालुक्यात झाला आहे. वाईपासून सांगलीपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात अनेक गावांचे सांडपाणी मिसळत आहे. तसेच काही उद्योगातील दूषित पाणी थेट नदीपात्रात येऊन मोठ्याप्रमाणात मिसळत आहे.

सध्या देशात नदी स्वच्छता अभियान सुरू आहे. गावे, शहरे हागणदारीमुक्त होऊ लागली आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. पण शौचालयांतील दूषित पाण्याची व्यवस्था कुठेही नसल्याने हे पाणीसुध्दा गटारीतून नदीतच मोठ्याप्रमाणात मिसळत आहे. कृ ष्णा नदीत मोठ्याप्रमाणात जलपर्णी, केंदाळ, गवत उगविले आहे. पाण्याला हिरवा रंग आला आहे.जनावरे धुणे, धार्मिक कार्यक्रमानंतर नदीत वस्तू विसर्जन करणे, विविध प्रकारचा कचरा याची प्रदूषणात भर पडत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याचे शुध्दीकरण करणे गरजेचे आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासन गांभीर्याने पाहात नाही.जनजागृतीची गरजवाढत्या प्रदूषणामुळे सांगलीतील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. पाणी प्रदूषणाची कारणे आणि ते रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जावी.प्रदूषण महामंडळ करते काय?सांगली जिल्'ातील कार्यरत असणारे प्रदूषण नियंत्रण महामंडळ कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत उदासीनतेची भूमिका बजावत आहे. असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. प्रदूषण विभागाने याकडे लक्ष द्यावे. 

 

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी