शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहकाने सर केला लिंगाणा, सांगलीच्या काजल कांबळेने फडकविला तिरंगा

By संतोष भिसे | Updated: January 5, 2024 15:38 IST

अतिशय कठीण व आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या लिंगाण्याची उंची ३१०० फूट

संजयनगर : सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी अतिशय कठीण व आव्हानात्मक मानला जाणारा लिंगाणा किल्ला सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल कांबळे हिने सर केला. लिंगाणा सर करणारी ती पहिलीच दिव्यांग मुलगी ठरली आहे.लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. रायगड स्वराज्याचे राजगृह, तर लिंगाणा स्वराज्याचे कारागृह असे म्हटले जाते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा हा सुळका आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट ही पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या साहाय्यानेच चढता येते.काजलच्या मोहिमेची सुरुवात मोहरी (जि. पुणे) गावापासून झाली. दोन तासांची पायपीट करून बोराट्याची नाळ उतार होऊन उजव्या बाजूला ट्रॅवर्स मारल्यावर रायलिंग आणि लिंगाण्याच्या खिंडीत पोहोचता येते. प्रथम १२ फूट चिमणीवर चढाईनंतर उजव्या बाजूला गुहा, तर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. येथून पुढे टप्प्याटप्प्याने तीन सरळसोट ९० अंशांतील कातळकडे चढावे लागतात. त्यानंतर लिंगाण्याचे शिखर गाठता येते. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि दोन्ही बाजूंना खोल दरी असलेला तब्बल १००० फूट निसरडा खडतर मार्ग आहे. या मोहिमेत काजलला जॉकी साळुंखे, भारत वडमारे, लव थोरे यांनी मार्गदर्शन केले. तिच्यासोबत गायत्री फडके, प्रीती फडके, नयना बोराडे, माधवी पवार, सचिन मराठे, प्रथमेश, अभिषेक साळवी, अशिष कुमार यांनी मोहीम पूर्ण केली.

टॅग्स :Sangliसांगली