मांगले परिसरात विजांचे थैमान, मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:14+5:302021-05-08T04:28:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : मांगले (ता. शिराळा) परिसराला वादळी वारे, विजांचे थैमान व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दीड ...

Lightning strikes in Mangle area, followed by torrential rains | मांगले परिसरात विजांचे थैमान, मुसळधार पावसाने झोडपले

मांगले परिसरात विजांचे थैमान, मुसळधार पावसाने झोडपले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मांगले : मांगले (ता. शिराळा) परिसराला वादळी वारे, विजांचे थैमान व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दीड तास झोडपले. शेतात सर्वत्र पाणी साठले होते. अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे व घरांचे छत उडून गेले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शिवाय विजेचे खांब पडल्याने मांगले-कांदे रस्ता बंद झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून मांगले परिसराला पाऊस हुलकावणी देत होता. गुरुवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून हवेत उष्णता होती. सायंकाळी सव्वापाच वाजता वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर विजांचे थैमान सुरू होते. दीड तासानंतर पाऊस सुरूच होता. हा पाऊस खरीप हंगामाच्या मशागतीसाठी व उभ्या ऊस पिकास उपयुक्त आहे.

फोटो - मांगले येथील तालुका क्रीडांगणावर साठलेले पाणी तर दुसरे छायाचित्र दुकानांवरील उडालेल्या छपराचे.

Web Title: Lightning strikes in Mangle area, followed by torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.