शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

नयनरम्य आतषबाजीत उजळले कवठेएकंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:16 IST

प्रदीप पोतदार ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : येथे श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणाºया नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १३ तास पालखी सोहळा रंगला. प्रशासन व यात्रा कमिटीने चोख व्यवस्था केली, तर ग्रामस्थ व दारू शोभा मंडळांकडून संयोजनाची ...

प्रदीप पोतदार ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : येथे श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणाºया नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १३ तास पालखी सोहळा रंगला. प्रशासन व यात्रा कमिटीने चोख व्यवस्था केली, तर ग्रामस्थ व दारू शोभा मंडळांकडून संयोजनाची चोखपणे जबाबदारी बजावली. त्यामुळे शांततेत व सुरक्षित सोहळा पार पडला.रात्री ९ वा. श्री मंदिरात पूजा-अर्चा होऊन हजारो औटांच्या सलामीने सोहळ्यास सुरुवात झाली. शिलंगण चौकात चव्हाण-पाटील कट्टा येथे दसºयाचे सोने आपटा पूजन करण्यात आले. पालखीचे सर्व मानकरी, सेवेकरी, गुरव, पुजारी आदी भाविकांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज आणि श्री बिरदेव महालिंगरायाचा पालखी सोहळा नेत्रदीपक आतषबाजीची सलामी घेत पुढे पुढे सरकत होता.श्री सिध्दराजाच्या पांढरीत भाविकांची जमलेली गर्दी, गर्दीतून उमटणारा हर हरचा गजर, अवकाशात होणाºया सोनेरी ठिणग्यांचा वर्षाव अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात कवठेएकंद (ता. तासगाव) येथे विजया दशमीचा सीमोल्लंघन सोहळा परंपरा, भक्ती आणि कलेचा संगम आतषबाजीच्या माध्यमातून साकारण्यात आला. सोहळ्यात विद्युत रोषणाईने सजवलेला अश्व, आरती-दिवटी, छत्र-चामर, पोषाख व शस्त्रधारी सेवेकरी अशा दिमाखात दोन्ही पालख्या ‘हर हर’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या साक्षीने ‘भक्ती आणि कलेचा’अनोखा मिलाफ आतषबाजीच्या नानाविध प्रकारांतून अनुभवण्यास येत होता. पारंपरिक दारूकामाबरोबरच नव्याने ताज्या घडामोडींवरील आतषबाजी करण्यासाठी मंडळांनी सहभाग घेतला. मुजावर फ्रेंड सर्कलने ‘पेट्रोल दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त करीत ‘पेट्रोल पंपावर महागाईचा भडका’ ही आतषबाजी साकारली. आझाद मंडळाचा ‘पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा’ हा देखावा लक्षवेधी ठरला. तसेच फुगडी, मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्य पान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारूकामाबरोबरच गोल्डनची वेस, सिध्दिविनायकचा ‘सूर्य व आॅलिम्पिक फायर शो, औटांची बरसात यशस्वी ठरली. ‘आकाशदीपचे सोनेरी ठिणग्यांचे झाडकाम, नवरंग, बसवेश्वर, सप्तरंगचे रंगीत चक्रे, कोरे अड्डयाची लाकडी शिंगटे’, तर ए वन मंडळाकडून श्री सिध्दराज महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन, तर आतषबाजीचा ‘डिजिटल कारंजा’ साकारण्यात आला. सुसंघ मंडळ, नवरंग, बसवेश्वर मंडळाकडून सप्तमुखी, पंचमुखी झाडकाम लक्षवेधी करण्यात आले. हिंदमाता मंडळाचे पांढºया झाडकामाने डोळे दिपवले. अग्निपुत्र अजिंक्यतारा मंडळाच्या ‘कागदी शिंगटांचा दरारा’ही खास लक्षवेधी ठरला. आ. सुमनताई पाटील यांनी देवालयात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.