शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडू : सुमनताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:25 AM2021-01-18T04:25:03+5:302021-01-18T04:25:03+5:30

तालुक्यातील जाधववाडी येथे राज्य शिक्षक समितीच्या तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. आमदार ...

Let's raise teachers' questions in the assembly: Sumantai Patil | शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडू : सुमनताई पाटील

शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडू : सुमनताई पाटील

Next

तालुक्यातील जाधववाडी येथे राज्य शिक्षक समितीच्या तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. आमदार पाटील म्हणाल्या, तालुक्यातील शिक्षकांनी नेहमीच गुणवत्तावाढीसाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांचे प्रश्न आपण स्वतः विधानसभेत मांडू आणि आगामी काळात शाळांसाठी सर्वतोपरी मदत करू.

शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर म्हणाले, शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. कोविडसारख्या महामारीत शिक्षक समितीने शिक्षकांच्या भवितव्यासाठी अनेक उपक्रम राबविले. शिक्षकांसाठी अद्ययावत हॉस्पिटल उभे करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, यु. टी. जाधव, किरण गायकवाड, सयाजी पाटील, बाबासाहेब लाड यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष मनोज कोळेकर यांनी केले. विनोद पाटील यांनी स्वागत केले. शशिकांत बजबळे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र जाधव, शुभांगी घाटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुनील गुरव, किसन पाटील, शशिकांत भागवत, दयानंद लाड, महादेव माळी, राजेंद्र बजबळे, चंद्रकांत कोळी, विश्वनाथ काशीद, अशोक बेडगेसह शिक्षक, शिक्षिकांची उपस्थिती होती.

फोटो : १७ शिरढाेण १

ओळी : जाधववाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीतर्फे आ. सुमनताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आशा पाटील, विकास हाक्के, मनोज कोळेकर आदी.

Web Title: Let's raise teachers' questions in the assembly: Sumantai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.