शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार, समितीवर गुन्हे दाखल करू

By admin | Updated: January 29, 2015 23:39 IST

सतीश लोखंडे यांचा इशारा : चौदा पाणीपुरवठा योजनांमध्ये हलगर्जीपणाचा ठपका

सांगली : जिल्ह्यातील ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप रखडल्या असून, त्यातील काहींनी त्या पूर्ण करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्या योजना पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. चौदा पाणी पुरवठा योजनांच्या कामातील हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आज, बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. सध्या जिल्ह्यात ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी उंच टाकीचे काम न झालेल्यांमध्ये धुळकरवाडी, कंठी, लकडेवाडी, लमाणतांडा, पांढरवाडी, सोनलगी, जिरग्याळ, जालिहाल खुर्द आणि गुगवाड येथील योजनांचा समावेश आहे. तसेच समितीने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविलेल्यांमध्ये लिंगीवरे, करेवाडी, वळसंग, निगडी खुर्द आणि खटाव अशा एकूण चौदा योजना पूर्णपणे रखडलेल्या आहेत. त्यांना याबाबत वेळोवेळी संधीही देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित योजनेशी संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.सुधारित मंजुरीकरिता आटपाडी पाणी पुरवठा समितीने शासनाकडे योजना पाठविली असून तिला मंजुरी मिळाली आहे. जाडरबोबलाद (ता. जत) येथे सुधारित कामाची आवश्यकता नसून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच सादर केलेल्या योजनांपैकी भिवर्गी आणि साळमळगेवाडी (ता. जत) येथील योजनांना अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. रखडलेल्या योजनांपैकी मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये लाडेगाव, मरळनाथपूर, शिरटे, गौरवाडी, बहाद्दूरवाडी, खरातवाडी, तर जून २०१५ मध्ये पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये इटकरे, बावची, ठाणापुडे, कुरळप, घोलेश्वर, खैराव, खंडनाळ येथील योजनांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१५ पर्यंत तुजारपूर, येडेनिपाणी, बोरगाव या तीन योजना पूर्ण होणार आहेत. ऐतवडे खुर्द येथील योजना ही तक्रारीमुळे बंद करण्यात आली आहे. बनेवाडी, मिरजवाडी आणि नृसिंहपूर येथील योजना पूर्ण झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले. यापूर्वी गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड- सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अमृतवाडी येथील योजना समितीने तेथील योजनेकरिता आवश्यक असणारे पैसे शासनास परत केले आहेत. उंच टाकीचे काम न झालेल्या योजनांपैकी करेवाडी - तिकोंडी आणि सुसलाद येथील योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बहे येथील योजनेने सुधारित तांत्रिक मंजुरी घेऊन निवीदा प्रक्रिया सुरू असल्याने तेथील कामही लवकरच सुरू होणार आहे. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)योजनांचा आराखडा सादरग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात १४ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड - सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती सतीश लोखंडे यांनी दिली.