शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वनविभागाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 12:33 IST

बिबट्याला बघण्यासाठी गर्दी

शंकर शिंदेऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे-ऐतवडे खुर्द येथे मुख्य रस्त्यालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देवूनही घटनास्थळी कुणीच वेळेत न पोहचल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी चर्चा सुरु होती.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द मुख्य रस्त्यालगत देवर्डे हद्दीत तीन वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क केला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने बिबट्याने प्राण सोडला. बिबट्याच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली. मागील आठ दिवसापासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत्तखडी परीसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वन विभागाला याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ऐतवडे खुर्द सह करजंवडे, देवर्डे, चिकुर्डे, कुरळप आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मंदिराच्या आसपास बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.

बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतात काम करत असताना अचानक समोरून बिबट्या आलेल्याने त्यांची धादंल उडाली होती. या परिसरात असणाऱ्या शेतवस्ती वरील कुत्र्यांना बिबट्याने आपले भक्ष केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुत्र्यांचा, जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे ऐतवडे खुर्द ग्रामसभेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग