शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील पेठ-महादेववाडी रस्त्यावर बिबट्याची दुचाकीवर झडप; महिला व मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:10 IST

रेठरे धरण : पेठ ते महादेववाडी या रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) रात्री सुमारे ९ वाजता शेतातून अचानक बाहेर येत ...

रेठरे धरण : पेठ ते महादेववाडी या रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) रात्री सुमारे ९ वाजता शेतातून अचानक बाहेर येत बिबट्याने माणिकवाडी येथील दाम्पत्याच्या दुचाकीवर झडप टाकली आणि हल्ला केला. यामध्ये दुचाकीवरील महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्ल्यानंतर, संबंधित दुचाकीवरील दाम्पत्य माणिकवाडी येथे आल्यावर या घटनेची माहिती मिळाली.माहितीनुसार, माणिकवाडी (ता. वाळवा) येथील राहुल खाशाबा कुंभार (३७), त्यांची पत्नी कोमल आणि सात वर्षांची मुलगी शर्वरी हे तिघेजण पेठकडून महादेववाडी ते माणिकवाडीकडे दुचाकीवरून प्रवास करत होते. जेव्हा ते महादेववाडी रस्त्यावर आले, तेव्हा अचानक अंधारातून बाहेर येत बिबट्याने गाडीवर झडप टाकली आणि कोमल यांच्या पायावर पंजा मारून त्यांना गंभीर जखमी केले. बिबट्याच्या पंजाने त्यांच्या मुलीच्या पायावरही ओरखडा आला आहे. हल्ल्यानंतर घाबरलेल्या राहुल कुंभार यांनी तिघांना दुचाकीसह माणिकवाडी येथे आणले आणि गावातील लोकांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर कुंभार दाम्पत्य खूप घाबरले होते. पुढील उपचारासाठी त्यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वनपाल दादासाहेब बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर आणि रेस्क्यू टीमचे प्रमुख युनूस मणेर यांनी जखमींना इस्लामपूर येथे दाखल केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks bike on Sangli road, injures woman, child.

Web Summary : A leopard attacked a couple and their daughter on a motorcycle near Sangli. The woman and child were seriously injured and hospitalized. The incident occurred at night on Peth-Mahadevwadi road, creating panic in the village.