शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघमारेवाडीत शेळीवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:48 IST

येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आहे. 

ठळक मुद्देयेळापूर परिसरातील आठवड्यातील तिसरी घटनाशेतकऱ्यानी डोंगरात जाणेच केले बंदबिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी

कोकरुड , दि. १३ :  येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आहे. 

येळापूर परिसरातील वाघमारेवाडी, जामदारवाडी, चव्हाणवाडी येथील लोक आपल्या म्हैशी, शेळ्या, घेऊन चारण्यास जातात. अनेक वर्षापासून हे सुरु आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून डोंगरावर गेलेल्या जनावरांवर बिबट्याकडून हल्ला होत आहे. आठ दिवसांपूर्वी तानाजी जामदार यांच्या शेळीस बिबट्याने ठार केले होते, तर रविवारी सुभाष वाघमारे यांची शेळी ठार केली.

बुधवार, दि. ११ रोजी लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर हल्ला केला. मात्र यावेळी शेळीला वाचविण्यात यश आले असले तरी, मोठ्या जखमा झाल्या असल्याने शेळी वाचण्याची शक्यता कमी आहे.

या परिसरात अशा तीन घटना झाल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे फिरकले नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकरी डोंगरात जनावरे चरावयास अथवा चारा आणावयास जाण्यास घाबरत असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरी