शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 17:30 IST

भविष्यात राज्यात होणाऱ्या किंवा सध्या स्थानिक पातळ्यांवरील सर्व निवडणुका भाजप स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांगली : निवडणुकांमधील घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्यात आल्या. भाजपने त्यात पुढाकार घेतला, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरेकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता विधानपरिषद निवडणुकीवर भाष्य केले.  ते म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकांना बिनविरोधची परंपरा आहे. त्यामुळे भाजपने या परंपरेप्रमाणे निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. त्याचबरोबर निवडणुका झाल्या असत्या तर मोठा घोडेबाजार झाला असता. भाजपला असा घोडेबाजार नको आहे. भविष्यात राज्यात होणाऱ्या किंवा सध्या स्थानिक पातळ्यांवरील सर्व निवडणुका भाजप स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सत्ताबदल होणार हे आमचे भाकीत नसून खात्रीराज्यात येत्या काही महिन्यात सत्ताबदल होणार हे आमचे भाकीत नसून खात्री आहे. सरकार पडून मध्यावधी निवडणुका लागणार नसून भाजपचे सरकार सत्तेत येईल. आम्हाला कोण साथ देणार या गोष्टी आम्ही आताच उघड करणार नाही. याबाबत योग्यवेळी स्पष्टीकरण होईल. राज्यातील सर्वात मोठा पक्ष आमचा असल्याने आम्ही कोणाला साथ देणार नाही, तर एखादा पक्ष आम्हाला साथ देईल.राज्यात गेल्या दोन वर्षात एकाही प्रश्नाची सोडवणूक महाविकास आघाडी सरकारला करता आलेली नाही. बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार, एसटी कर्मचारी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत आदी प्रश्न सरकारला सोडविता आलेले नाहीत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवरुन आम्ही सरकारला धारेवर धरु.‘त्या’ पापाचे धनी कोण?केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मृत्यूवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर दरेकर म्हणाले की, राज्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांचे बळी आंदोलन काळात गेले. या पापाचे धनी कोण, हे राऊतांनी अगोदर स्पष्ट करावे.पूरग्रस्तांच्या यादीत बोगस नावेसांगली जिल्ह्यासह राज्यात महापूर, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापाऱ्यांना तुटपुंजी मदत देणाऱ्या या सरकारने लाभार्थ्यांच्या यादीत बोगस नावे घुसडली आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्यावाएसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा. सर्वच महामंडळे नंतर विलीनीकरणाची मागणी करतील, हा दावा करणे योग्य नाही, असे दरेकर म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीpravin darekarप्रवीण दरेकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक