शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांच्या परवान्याबाबत सांगली महापालिकेकडून कायद्याची एैसीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:19 IST

Sangli Muncipalty Hospital- महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या बहुतांश रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बसवून परवाना घेतला असला तरी, कायद्यानुसार ही यंत्रणा उभारली नसल्याचे समोर येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी कायद्याला हरताळ फासत अनेक रुग्णालयांना परवाने दिले आहेत. केवळ गॅस व पावडरचे रिफिलिंग असलेल्या रुग्णालयांनाही परवाने देऊन कायदाच धाब्यावर बसविला गेला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयांच्या परवान्याबाबत सांगली महापालिकेकडून कायद्याची एैसीतैसी रुग्णांच्या जिवाशी खेळ : चिरीमिरीसाठी नियमांनाच हरताळ

सांगली : महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या बहुतांश रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बसवून परवाना घेतला असला तरी, कायद्यानुसार ही यंत्रणा उभारली नसल्याचे समोर येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी कायद्याला हरताळ फासत अनेक रुग्णालयांना परवाने दिले आहेत. केवळ गॅस व पावडरचे रिफिलिंग असलेल्या रुग्णालयांनाही परवाने देऊन कायदाच धाब्यावर बसविला गेला आहे.महापालिकेकडे मुंबई नर्सिंग ॲक्टनुसार २८६ रुग्णालयांची नोंद आहे. २००७ मध्ये आग प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले. बहुतांश रुग्णालयांनी महापालिकेकडून परवानेही घेतले. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरकमाईच्या नादात कायद्यानुसार यंत्रणा बसविली की नाही, याची शहानिशाच केलेली नाही.

१५ मीटरपेक्षा उंच इमारत असलेल्या रुग्णालयात अग्निशामक रिफिलिंग, गुंडाळी पाईप, नळखांब अशा यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. पण केवळ गॅस व पावडरचे रिफिलिंग बसविलेल्या या रुग्णालयांनाही परवाने दिल्याचे तपासणीत समोर येत आहे. चिरीमिरीसाठी रुग्णांच्या जिवाशी महापालिकेने खेळ सुरू केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.रुग्णालयासोबत वादावादीचे प्रसंगतत्कालीन अग्निशमन अधिकाऱ्यांनी शहरातील रुग्णालयांना परवाने दिले. पण नियमानुसार या रुग्णालयांनी यंत्रणा उभारली की नाही, हे पाहिले नाही. आता महापालिकेने नव्याने सर्व्हे सुरू केला आहे. त्यात रुग्णालयांना आवश्यक सर्व यंत्रणा उभारावी, अशी सूचना दिली जात आहे. पण रुग्णालयांकडून, पूर्वी परवाने मिळत होते, आताच काय झाले, असा सवाल करीत वादही घातला जात आहे.सरकारी रुग्णालयांकडेही आवश्यक एनओसी नाहीमहापालिका क्षेत्रातील सरकारी रुग्णालयांनीही अग्निशमन विभागाकडून एनओसी घेतलेली नाही. मिरजेतील सरकारी रुग्णालयाने यंत्रणा उभारली आहे. परवान्यासाठी महापालिकेकडे अर्जही केला आहे. या रुग्णालयाने उभारलेल्या यंत्रणेची तपासणी अद्याप झालेली नाही. तपासणीनंतरच परवान्याचा निर्णय होणार आहे.

भंडारा येथील अग्निकांडानंतर आयुक्तांच्या आदेशाने रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत २०३ रुग्णालयांची तपासणी झाली आहे. काही रुग्णालयाऽत आवश्यक यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे. त्यांना लवकरच महापालिकेकडून नोटिसा बजाविल्या जातील.- चिंतामणी कांबळे, अग्निशमन विभागप्रमुख

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका