शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

By admin | Updated: June 7, 2017 00:24 IST

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : प्रभू रामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आले होते म्हणतात. पण सध्या आटपाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा येथे गेल्या १४ वर्षांपासून वनवास सुरु आहे. मागील १४ वर्षात फक्त एक अधिकारी वगळता, एकही पोलिस निरीक्षक येथे टिकला नाही. मुदतीपूर्वीच निरीक्षकांच्या बदल्या होण्यामागचे गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आटपाडी पोलिस ठाण्याचे जिल्ह्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यास जिल्हा पोलिसप्रमुख अथवा तत्सम दर्जाचे अधिकारी क्वचितच भेट देतात. त्यामुळे अनेकदा येथील सगळा आलबेल कारभार सुरु असतो. आटपाडी तालुका म्हणजे दुष्काळी तालुका. त्यात स्थलांतरितांची संख्या अधिक. त्यामुळे तालुका कायम शांत असतो. अगदी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठीची आंदोलनेही इथे कायम शांततेतच पार पडली. कधीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली नाही.अशा या दुष्काळी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष मात्र तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षातून मारामाऱ्या घडत आहेत. विरोधकांची जिरवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा वारंवार आरोप केला जात आहे. त्यातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रसिध्द होत चाललेल्या या पोलिस ठाण्यात आता अधिकाऱ्यांची सारखी बदली होण्याबाबतही चर्चा होऊ लागली आहे. मुदतीआधीच बदली झाल्यामुळे थेट अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेऊन पुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यावर कब्जा मिळविल्याचेही उदाहरण आहे. त्यामुळे बदली होईल या भीतीपोटी जर अधिकारी काम करु लागले, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ सर्वच अधिकारी सक्षम होते असाही नाही आणि गेल्या १४ वर्षात मुदतीपूर्वीच बदली झालेले सर्वच अधिकारी अकार्यक्षम होते, असेही म्हणता येणार नाही. तरीही येथील अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदल्या होत आहेत. एकूणच या बदली प्रकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी चुकीचा संदेश जाणार नाही, याची खबरदारी इथल्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बदली करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.एकही अधिकारी सलग दोन वर्षे नाही!पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा अपवाद वगळता, गेल्या १४ वर्षांत एकाही पोलिस निरीक्षकांना सलग दोन वर्षे येथे सेवा करता आलेली नाही. त्यामुळे बदलीची टांगती तलवार डोक्यावर असणारे अधिकारी लोकांना न्याय कसे देणार? हा प्रश्नच आहे. पोलिस निरीक्षक रसिकलाल गुजर यांनी त्यांच्या बदलीविरोधात ‘मॅट’मध्ये जाऊन न्याय मागण्याचे धाडस दाखविले. परवा साडेदहा महिन्यातच बदली झालेले पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी सध्या आजारी रजेवर गेले आहेत. तेही ‘मॅट’मध्ये जाऊन बदलीविरोधात आवाज उठवणार असल्याची चर्चा आहे.पोलिस निरीक्षकांचा कार्यकालचंद्रकांत देशमुख २६ मार्च २००४ ते ६ आॅक्टोबर २००५, दयाराम शिंदे ६ आॅक्टोबर २००५ ते २६ जून २००६, लक्ष्मणराव जाधव २६ जून २००६ ते ८ मे २००७, चंद्रकांत देशमुख ९ मे २००७ ते २१ एप्रिल २००८, किसन गवळी २१ एप्रिल २००८ ते ३० जानेवारी २००९, राजाराम शिंदे ३० जानेवारी २००९ ते १६ एप्रिल २०१०, रसिकलाल गुजर १६ एप्रिल २०१० ते २८ आॅक्टोबर २०११, संजय पवार २८ आॅक्टोबर २०११ ते ८ मार्च २०१२, रसिकलाल गुजर ८ मार्च २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१२, सुनील गिड्डे १ नोव्हेंबर २०१२ ते १३ डिसेंबर २०१२, एन. जी. कुलकर्णी १४ डिसेंबर २०१२ ते १९ फेब्रुवारी २०१४, सुनील गिड्डे १९ फेब्रुवारी २०१४ ते ८ जून २०१४, सदाशिव शेलार ८ जून २०१४ ते ३ जून २०१६, सुधाकर देढे १६ जून २०१६ ते १८ जुलै २०१६, के. एस. पुजारी १८ जुलै २०१६ ते २ जून २०१७.