सावंतपूर : आज सर्व क्षेत्रांत नोकरी मिळण्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. आशेचा किरण असलेल्या इंजिनियरिंग व स्पर्धा परीक्षांच्या मृगजळामागे धावणाऱ्या बहुसंख्य तरुणांच्या पदरी निराशा येत आहे. अशा स्थितीत खडतर परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध केलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन आवडीच्या क्षेत्रात धाडस करायला शिका आणि सिद्ध व्हा, असे प्रतिपादन व्ही. वाय पाटील यांनी केले.
नागराळे (ता. वाळवा) येथे व्ही. वाय. आबा पाटील समाजप्रबोधन अकॅडमी व ग्रामविकास वाचनालयाने आयोजित केलेल्या गुणवंतांचा गौरव समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी नौदलात करिअर केलेल्या संकेत विकास माने (आंधळी), ऑडिटर म्हणून काम करण्यास शासकीय मान्यता मिळालेले सचिन बळवंत चव्हाण व संग्राम श्रीकांत पाटील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला राजवीर परीट, सॉफ्टबॉल स्पर्धेतील विजयाबद्दल अंजली उमेश पवार, अपंग असताना कळसुबाई शिखर सर केलेली अस्मिता पाटील हृदयरोग व बालरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुराज रवींद्र पाटील (नागराळे) या गुणवंतांचा सरपंच वनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. शंकरराव कुंभार महंमद सैदापुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
रफिक मुलानी यांनी सूत्रसंचालन केले. बी. सी. पाटील यांनी समारोप केला.
समारंभाला दिलीप पाटील, शशिकांत पाटील, उपसरपंच इंद्रजित पवार, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष नंदाताई पाटील, प्रा. ए. सी. पाटील, यशवंत बाबर धैर्यशील पाटील, सम्राट पाटील, विशाल दिंडे, अशोक गायकवाड, हणमंतराव दिंडे, पांडुरंग हजारे, विकास पाटील, प्रकाश पाटील, ॲड. विकास माने, राहुल पाटील, दादा पाटील, धीरज पाटील, उल्हास पाटील उपस्थित होते. सुरुवातीला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला त्यांच्या नवव्या स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.