शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेपरलेस न्यायालयाची संकल्पना साकार होईल, प्रदीप शर्मा यांचे प्रतिपादन; सांगलीत पायलट प्रोजेक्टचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:16 IST

सांगली : न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राज्यात सांगली जिल्ह्यात राबवला जात आहे. या माध्यमातून ‘पेपरलेस’ न्यायालयाची संकल्पना ...

सांगली : न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राज्यात सांगली जिल्ह्यात राबवला जात आहे. या माध्यमातून ‘पेपरलेस’ न्यायालयाची संकल्पना साकार होणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांनी येथे केले.जिल्हा व सत्र न्यायालय येथे जिल्ह्यातील अभिलेख्यांचे संगणकीकरण (स्कॅनिंग अँड डिजिटायजेशन ऑफ रेकॉर्डस्) करण्याच्या ‘पायलट प्रोजेक्ट’ प्रारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांच्या हस्ते कागदपत्रांचे प्रातिनिधिक ‘स्कॅनिंग’ करून झाला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक मधुरा काकडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे, बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील, विधि सेवा प्राधिकरणचे सचिव गिरीजेश कांबळे, बी. डी. कासार, मधुसूदन अहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायाधीश शर्मा म्हणाले, न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण झाल्यामुळे वेळ, पैसा व जागेची बचत होणार आहे. न्यायालयीन कागदपत्रांचे संगणकीकरण व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल टाकले आहे. या संगणकीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संगणकीकरणाचे काम एकाच वेळी प्रत्येक न्यायालयाच्या ठिकाणी सुरू राहणार आहे. यासाठी संबंधितांनी योग्य तो समन्वय ठेवावा. विहित कालमर्यादेत कंपनीने कागदपत्रांचे संगणकीकरण करून आदर्श निर्माण करावा. न्यायालय अभिलेख्यांच्या संगणकीकरणातून भविष्यात पेपरलेस न्यायालयाची संकल्पना साकार होऊ शकेल. त्याची सुरुवात सांगलीतून होत आहे.न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रकल्प समन्वयक पी. मधुरा काकडे यांनी प्रास्ताविक केले. दिवाणी न्यायाधीश जी. जी. चौंडे यांनी सूत्रसंचालन केले. दिवाणी न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संगणक प्रमुख सुदर्शन रोटीथोर, तसेच न्यायालयातील अधिकारी, वकील व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील संगणकीकरण कामाची दखलन्यायाधीश शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज शंभर टक्के संगणकीकृत झाले आहे. कोरोनाकाळातील ई- फाइलिंगच्या कामकाजाची दखल उच्च न्यायालयाने घेऊन कौतुक केले आहे. जिल्ह्यातील या कामामुळेच उच्च न्यायालयाने मुंबईबरोबरच सांगलीत अभिलेख संगणकीकरण योजना मंजूर केली. ती प्रत्यक्षात सुरू झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय