शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

By अविनाश कोळी | Updated: April 22, 2024 18:57 IST

तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात काँग्रेसचे दिवंगत नेते प्रकाशबापू पाटील यांनी  विजयाची एकमेव हॅटट्रिक नोंदविली आहे. अन्य कोणत्याही नेत्याला ही किमया साधता आली नाही. पाचवेळा खासदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९८०ची लोकसभा निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर त्यांनी १९८४च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांना मैदानात उतरविले. प्रकाशबापूंनी ती निवडणूक मोठ्या मत फरकांनी जिंकली. त्यानंतर १९८९ व १९९१च्या निवडणुकीत पुन्हा प्रकाशबापूंनी विजय नोंदवित खासदारकीची हॅटट्रिक नोंदविली होती. या तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे होते.लोकसभेच्या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी लोकसभेच्या १९९६, १९९८ व १९९९ अशा सलग तीन निवडणुका लढविल्या. ९६ व ९८च्या निवडणुकीत त्यांनी मोठे विजय नोंदविले. खासदारकीची हॅटट्रिक त्यांनाही नोंदवायची होती. मात्र, प्रकाशबापू पाटील यांनी त्यांचा १९९९च्या निवडणुकीत पराभव केला.

त्यानंतर प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी २००६च्या पोटनिवडणुकीसह २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली. मात्र, त्यांना २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचीही हॅटट्रिक हुकली होती. १९७१ व १९७७च्या लोकसभा निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे गणपती गोटखिंडे यांनी तिसरी निवडणूक लढविली नाही.

प्रकाशबापू सर्वाधिक वेळा खासदारसांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापू पाटील यांच्या नावे सर्वाधिक वेळा खासदार होण्याचा विक्रम नाेंदला गेला आहे. त्यांनी पाचवेळा विजय मिळविला होता. विशेष म्हणजे ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. जेव्हा जेव्हा ते मैदानात उतरले तेव्हा विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४