शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, भीमराव महिंद, आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण लाड म्हणाले, मागील गळीत हंगामात एफआरपीपेक्षा ८१९ रुपये जादा दर दिला आहे. साखर उतारा १२.५५ टक्क्यांप्रमाणे २ हजार ५३६ रुपये होत असताना, ३ हजार ३५५ रुपये दर दिला असून, यापैकी २ हजार ९३६ रुपये शेतकºयांना अदा केले आहेत. आता उर्वरित ३६९ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांना दहा रुपये दराने दहा किलो साखर देऊ केली आहे. तसेच कर्मचाºयांना २८ टक्के बोनस, तर हंगामी कामगारांना कारखाना बंद काळात निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. याबरोबरच कार्यक्षेत्रात ५८ गावांत ३६ हजार ७९१ वृक्षांची लागवड केली आहे. कार्यक्षेत्रात एलईडी दिव्यांचे वाटप केले आहे. इतर अनेक सामाजिक उपक्रम कारखान्यामार्फत राबविले जात आहेत. गतवर्षी निडवा उसाला अंतिम दरापेक्षा १०० रुपये जास्त दिले आहेत. यावर्षी को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत आहे. एकूण १९.७० मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प प्रदूषणविरहित असून, देशातील सर्वोच्च तंत्रज्ञानाचा नमुना आहे. यंदा हा प्रकल्प चालू होणार आहे.ऊसविकास सुविधांचा वापर करुन कार्यक्षेत्रातील शेतकºयांनी एकरी उत्पन्न वाढवले आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी कारखान्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. शासनाने ऊस पिकासाठी ठिबक अनिवार्य केले आहे. त्यामुळे कारखान्याने ठिबकसाठी एकरी सात हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. शासन ऊस शेतीबाबत उदासीन आहे. त्यामुळे शेतकºयांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही लाड यांनी केले. जयप्रकाश साळुंखे यांनी स्वागत, तर पोपट संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी विषय पत्रिका वाचन, तर वित्त अधिकारी शामराव जाधव व आप्पासाहेब कोरे यांनी अहवाल वाचन केले.दिलीप लाड, हिम्मतराव पवार, अनिल लाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सचिव वसंतराव लाड, पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, आर. एम. पाटील, दिनकर लाड, कुंडलिक एडके, अशोक पवार, व्ही. वाय. पाटील, नंदाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.वजनात फरक पडल्यास लाभाचे बक्षीस!कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी गळितास येणाºया उसाच्या वजनात फरक पडला, तर एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.