शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

शहीद रामचंद्र माने यांना अखेरचा निरोप

By admin | Updated: February 1, 2017 23:20 IST

रामपूरवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार : कुटुंबीयांना शोक अनावर; अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

कवठेमहांकाळ : रामपूरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शहीद जवान रामचंद्र शामराव माने बुधवारी अनंतात विलीन झाले. शोकाकुल वातावरणात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोठा मुलगा संकेत व भाऊ अनिल यांनी माने यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. तत्पूर्वी सैन्यदलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद माने यांना मानवंदना दिली.चार दिवसांपूर्वी जम्मूमधील कुपवाडा जिल्ह्यात माच्छिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात रामचंद्र माने कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. सोमवारी ही बातमी समजल्यापासूनच रामपूरवाडी परिसरात शोकाकूल वातावरण होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखाना कार्यस्थळावर भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर शहीद माने यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव घेऊन दाखल झाले. तेथे मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तेथून रुग्णवाहिकेतून रामपूरवाडीला नेत असताना कवठेमहांकाळ शहरात या वीर जवानाला सलाम करण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. नगरपंचायतीच्यावतीने मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. हिंगणगाव, करोली (टी) येथेही नागरिकांनी दुतर्फा अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. लष्करी ताफ्याबरोबर नागरिक रामपूरवाडीकडे रवाना होत होते.सकाळी साडेनऊ वाजता माने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. घरासमोर आई सुलाबाई, पत्नी सुनीता, मुले संकेत आणि रोहन, भाऊ अनिल, भानुदास यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकत होता. बेळगावहून आलेले सैन्यदलाचे कमांडर रॉबिन इब्राहीम यांच्या पथकाने तसेच जिल्हा पोलिस दलाने शहीद माने यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी बेळगाव, कोल्हापूर तसेच जम्मूहून आलेले लष्करी अधिकारी व जवानांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा साधना कांबळे, गणपती सगरे, गजानन कोठावळे, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनकर पाटील, सरपंच मधुकर खोत, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, जतचे उपविभागीय अधिकारी नवनाथ वाकुडे, नारायण पवार, महेश खराडे, मिलिंद कोरे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय जवान रामचंद्र माने यांच्या अंत्यदर्शनासाठी जमला होता. ‘शहीद रामचंद्र माने अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकाळी पावणेअकरा वाजता शहीद माने यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी चंदनाच्या लाकडांवर ठेवण्यात आले. कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा संकेत व भाऊ अनिल यांनी माने यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि शहीद माने अनंतात विलीन झाले. (वार्ताहर)पत्नीचा आक्रोश : मुले बावरली...रामचंद्र यांची पत्नी सुनीता यांना सावरणे सर्वांनाच अशक्य झाले होते. त्यांचा आक्रोश हृदयाला पाझर फोडणारा होता. ‘मी आता कुणाकडे पाहून जगायचं? माझं सर्वस्व गेलं...’ म्हणून त्यांनी टाहो फोडला. मोठा मुलगा संकेत नऊ वर्षाचा, तर लहान रोहन सहा वर्षाचा आहे. या चिमुकल्या लेकरांना तर नेमके काय चालले आहे, हे समजत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. भाऊ अनिलचा आक्रोश तर मन सुन्न करणारा होता. पुतण्या आदर्श आणि पुतणी ऋतुजा यांनाही शोक अनावर झाला होता. माने कुटुंबीयांची जबाबदारी शासनाची : सुभाष देशमुखशहीद रामचंद्र माने यांच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण जबाबदारी शासन घेईल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख आणि सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही, माने कुटुंबाला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. माझ्या रामाला कुठं शोधू?‘दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाऊन, काबाडकष्ट करून तळहातावरच्या फोडाप्रमाणे तीन लेकरांना जपलं, वाढवलं, शिकवलं, भरती केलं. आता या माझ्या रामाला कुठं शोधू, सांगा साहेब. माझं लेकरू परत येईल का हो?, कुणीतरी आणा की माझ्या पोराला. सुटीवर आलाय का रामा...’, असा आई सुलाबाई यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. यावेळी आमदार सुमनताई पाटील त्यांना समजावत होत्या. मात्र आई सुलाबाई यांचा गहिवर पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले.