शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

बारामती-संकेश्वर मार्गासाठी मिरज, तासगाव तालुक्यांत होणार भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:47 IST

केंद्र व राज्य शासनाने भरपाईची व्याप्तीही कमी केल्याने शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळणार नाहीत

सांगली : जिल्ह्यातून जाणाऱ्या नव्या बारामती-संकेश्वर महामार्गासाठी मिरज व तासगाव तालुक्यांत भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिसंपादन अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून २० गावांत भूमिसंपादन केले जाईल.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी नुकतेच काढले आहेत. मिरज व तासगावचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यावर  जबाबदारी सोपविली आहे. भारतमाता टप्पा २ परियोजनेतून या राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक १६०/७१) काम केले जाणार आहे. बारामतीमधून सुरू होऊन संकेश्वर येथे संपेल. त्यातील फलटण ते म्हैसाळ एक्सप्रेस वेमधील  काही भाग सांगली जिल्ह्यातून जात आहे. त्यासाठीच्या भूमिसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.दरम्यान, भूमिसंपादन होणाऱ्या काही गावांतील बरीच जमीन सिंचनाखालील असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कवलापूर,  मालगाव, टाकळी, बेडग, विजयनगर, म्हैसाळ, विसापूर, तासगाव, कवठेएकंद येथील पिकाऊ जमीन महामार्गासाठी जाण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाने भरपाईची व्याप्तीही कमी केल्याने शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळणार नाहीत. रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रेडीरेकनरच्या पाचपटींपर्यंत पैसे मिळाले होते, तितके या महामार्गासाठी मिळण्याची शक्यता नाही.या गावांत भूसंपादनमिरज तालुका : कवलापूर, काकडवाडी, रसुलवाडी, कानडवाडी, तानंग, मालगाव, टाकळी, बोलवाड, वड्डी, बेडग, विजयनगर, म्हैसाळ.तासगाव तालुका : लिंब, शिरगाव, विसापूर, तासगाव, वासुंबे, चिंचणी, कवठेएकंद, नागावकवठे

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूकBaramatiबारामती