शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
4
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
5
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
6
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
7
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
8
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
9
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
10
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
11
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
13
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
14
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
15
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
17
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
18
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
19
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
20
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

सांगली जिल्ह्यातील ७८ हजारांवर लाडक्या बहिणींचे पैसे बंद, अर्ज रद्द करण्याची कारणे काय.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: March 8, 2025 14:02 IST

राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी आली यादी : साडेसहा हजार लाभार्थ्यांच्या खात्यांवर होणार पैसे जमा

अशोक डोंबाळेसांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील सात लाख ४० हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून, यात ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याने रद्द होणार आहेत. त्यामुळे आता सहा लाख ६१ हजार ५२२ लाडक्या बहिणींच्या खात्यावर ८ मार्चला दोन हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी, अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांचे अनुदान ८ मार्चला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण सात लाख ४० हजार लाभार्थी होते. मात्र, सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता.ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत. त्यात चारचाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाने अपात्र होणाऱ्या ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणींची संख्या आहे. तसेच जवळपास ७५ लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करीत आहे, तर काही अर्जामध्ये पडताळणींमध्ये त्रुट्या आढळल्या.लाडक्या बहिणींचे या कारणांमुळे अर्ज रद्द

  • बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव : ११६६
  • एका प्रोफाईलवरून ५००, १००० पेक्षा जास्त अर्ज भरणे : ५७१९२
  • लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन : २०१२०

२० हजार बहिणींकडे चारचाकी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यात २० हजार १२० लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत. काही अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.चौकट

बहिणींनी सोडला लाभलाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या ७५ लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले आहेत.

७८ हजारांवर अर्जाची पडताळणीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सात लाख ४० हजार महिलांनी अर्ज केले होते. आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जांची पडताळणी करण्याचे काम शासनाकडे चालू आहे. राज्य शासनाकडूनच दुबार नाव, चारचाकी, आयकर भरणारे अशा ७८ हजार ४७८ अर्ज आले होते. हे सर्व अर्ज तालुकास्तरावर पाठविले असून, छाननी करून ते अर्ज रद्द होणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजना