शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फायद्यातील बॅँकेला राजकारणाचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:12 IST

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेली तीन वर्षे चोख ताळेबंद सादर करून फायद्यात राज्यात अव्वल आलेल्या सांगली जिल्हा बॅँकेला अनुत्पादित भ्रष्ट राजकारणाची कीड लागली आहे. चांगल्या धोरणांची, निखळ राजकारणाची मालमत्ता जमा बाजूवरून गायब झाली असून, त्याची जागा कुरघोड्या, स्वार्थी राजकारण आणि भ्रष्ट विचारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकारणाचा हा ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेली तीन वर्षे चोख ताळेबंद सादर करून फायद्यात राज्यात अव्वल आलेल्या सांगली जिल्हा बॅँकेला अनुत्पादित भ्रष्ट राजकारणाची कीड लागली आहे. चांगल्या धोरणांची, निखळ राजकारणाची मालमत्ता जमा बाजूवरून गायब झाली असून, त्याची जागा कुरघोड्या, स्वार्थी राजकारण आणि भ्रष्ट विचारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकारणाचा हा ताळेबंद सुधारला नाही, तर बॅँकेचा ताळेबंद बिघडू शकतो, याचे भानही अनेकांना राहिलेले नाही.वसंतदादा कारखान्याच्या कराराच्या मुद्द्यावरून ज्यांनी जिल्हा बॅँकेत राजकारण सुरू केले, त्यांनीच कधीकाळी भ्रष्टाचाराचे अनेक इमले याच बॅँकेत बसून बांधले होते. वास्तविक वसंतदादा कारखान्याच्या करारात काही त्रुटी आहेत, असे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाल्यानंतर त्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्या त्रुटी दूर करण्यासाठी संचालकांनी एक होणे गरजेचे होते, मात्र वसंतदादा कारखान्याचे प्रकरण पुढे करून यातील अनेकांना वेगळाच स्वार्थ साधायचा होता. कारखाना करारपत्राच्या खांद्यावरून पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधण्याचाच हा डाव होता. पट्टीच्या राजकारण्यांनी हे डावपेच राजकीय मैदानात नव्हे, तर वित्तीय संस्थेत सुरू केले आहेत आणि ते अशा संस्थेला घातक आहेत.जिल्हा परिषदेत, महापालिकेत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत कितीही राजकारण केले तरी, त्या संस्थेला काही फरक पडत नसतो, पण वित्तीय संस्थेला अविश्वासाचे, शंकांचे स्पर्श झाले की होत्याचे नव्हते झालेले कोणाला कळणारही नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे आर्थिक मनोरे अनेकदा अशाच राजकारणाने ढासळल्याचा इतिहास आहे.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी काहीजण सरसावल्याचे दिसते. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या सहकारतपस्वींच्या पाऊलखुणा जपणाºया बॅँकेत बºयाचजणांच्या वाटा नको त्यांच्या आदर्शाने मळल्या आहेत. गुलाबराव पाटील यांच्या आदर्श कारभाराचे उदाहरण आजही राज्याच्या कानाकोपºयातल्या संस्थांमधून दिले जाते, मात्र त्यांच्याच कर्मभूमीत, जन्मभूमीतील लोकांनी वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला होता.घोटाळ््यांमध्ये अडकलेले अनेक संचालकही सावध व चांगल्या मार्गाने जाताना दिसत होते. पारदर्शी कारभाराचे रंग जिल्हा बॅँकेच्या भिंतींवर उठून दिसत होते. स्वार्थी राजकारणाने आता या भिंती काळवंडल्या जात आहेत. छुप्या कुरघोड्या करून बॅँकेचा कारभार विस्कळीत करण्याचे एक मोठे कारस्थान बॅँकेत शिजले जात आहे. दुसरीकडे हा कट उधळण्यासाठीही एका गटाचे प्रयत्न सुरू आहेत.एक प्रकरण : वसंतदादा कारखान्याचेचवसंतदादा कारखान्याच्या करारपत्रावरून सध्या गदारोळ सुरू असला तरी, काही वर्षांपूर्वी याच वसंतदादा कारखान्याच्या बॅँक गॅरंटीचे प्रकरण गाजले होते. एका प्रकल्पासाठी जमा केलेली २ कोटी १६ लाखांची बॅँक गॅरंटी तत्कालीन संचालकांनी कारखान्यास परत केली होती. हा घोटाळा म्हणून गणला गेला; पण तत्कालीन संचालकांनी ही चूक दोनच वर्षांपूर्वी सुधारण्यासाठी आटापिटा केला. त्यावेळी सर्व संचालक एकवटले आणि कारखान्याला बॅँक गॅरंटी परत जिल्हा बॅँकेत जमा करण्यास भाग पाडले. ही एकी आताच्या करारपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी का होत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.ठेच लागूनही पुन्हा तेच!ठेच लागली की माणूस शहाणा होतो, असे म्हणतात; पण जिल्हा बॅँकेत हे तत्त्व लागू होत नाही. ठेच लागलेली अनेक माणसे पुन्हा त्याचठिकाणी बेफिकीरीचे पाऊल टाकण्यास सज्ज होतात. पारदशीपणाची अ‍ॅलर्जी झाल्याने अनेकजण नोकरभरतीसाठी पदाधिकारी बदलाचा घाट घालत आहेत.