शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! देशाला २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं; मंत्री सुरेश खाडे यांचं पहिलंच भाषण वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:04 IST

खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले

सांगली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव असताना त्याचा रौप्य महोत्सव म्हणून उल्लेख तसेच देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ चा उल्लेख करून कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी स्वातंत्र्य दिनाचा एकप्रकारे अवमान केला आहे. त्यांनी याबाबत जनतेची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

होनमोरे म्हणाले, खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले. मंत्री असणाऱ्या व्यक्तीने भान ठेवून जबाबदारीने, अभ्यास करून बोलणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सुरेश खाडे यांनी भाषण केले. यावेळी ते भान हरपल्यासारखे बोलले. त्यांच्या या वक्तव्यातून अज्ञानपणा दिसून आला.अमृत महोत्सवी वर्षाऐवजी रौप्य महोत्सवी वर्ष असा उल्लेख केला तसेच १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या त्यांच्या चुकीच्या वक्तव्यातून जिल्ह्याची व तालुक्याची बदनामी झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात खाडे कोणत्या भ्रमात बोलत होते, ते त्यांनाच माहीत असेल. भविष्यात मंत्रिपदाच्या खुर्चीचे भान ठेवूनच त्यांनी वक्तव्ये करावीत.

तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व, पण विकासाकडे दुर्लक्षमिरज विधानसभा मतदारसंघाचे ते तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु शहराच्या विकासाकडे त्यांचे लक्ष नाही. मिरज शहर पूर्वीप्रमाणेच बकाल राहिलेले आहे. खाडे यांनी प्रदीर्घ आमदारकी भोगूनही मतदारसंघ मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न तरी वंचित राहिला आहे. त्यांनी किमान मार्गी लावावेत. त्यांना रस्त्याच्या तसेच अन्य प्रश्नांबाबतही अजिबात गांभीर्य नाही. देशाच्या इतिहासाबाबत ज्यांना काही माहिती नाही, त्यांना अन्य गोष्टीचे भान कसे राहणार, असा सवालही होनमोरे यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन