शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुसुम सोलरचे संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, सरकारी यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया

By अशोक डोंबाळे | Updated: June 23, 2023 18:36 IST

प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

सांगली : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी धावपळ करीत असले तरी महाऊर्जा संकेतस्थळाला आलेल्या मरगळीमुळे ही योजना डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी एक हजार ६३० सोलर पंपांचे उद्दिष्ट आले आहे. पण, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून सरकारी यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अर्ज करताना आधार नंबर, भ्रमणध्वनी, गाव, जिल्हा, जात प्रवर्ग आदी माहिती भरून शंभर रुपये कपात होऊनही पुढील पेज उघडत नाही. कपात झालेले पैसेही मिळत नसल्याने शेतकरी, सीएससी केंद्र चालक कंटाळले असून यावर शासनाने उपाय काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कृषिपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होते आहे. दरवर्षी राज्यासाठी एक लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट असून १७ मेपासून संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विकास अभिकरणाच्या महाऊर्जा या संकेतस्थळाला अडचणी निर्माण होत. अनेकवेळा संकेतस्थळ चालत नाही. त्याचबरोबर ऑनलाइन काम करणाऱ्या सीएससी केंद्र चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुसुम सोलर योजनेसाठी सांगली जिल्ह्यासाठी एक हजार ६३० उद्दिष्ट असून संकेतस्थळाच्या दोषाबद्दल तक्रारी आहेत. त्यानुसार पुणे कार्यालयाकडे माहिती पाठविली आहे. लवकरच त्यात सुधारणा होईल. -समुद्रगुप्त पाटील, विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा कार्यालय.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी