शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

रस्ता रुंदीकरणात पन्नासहून अधिक वटवृक्षांवर कुऱ्हाड

By admin | Updated: June 12, 2014 00:49 IST

सावली जाणार : चिरंतन नात्यासाठी पूजल्या जाणाऱ्या वडाच्या झाडावर संक्रांत; नव्याने वटवृक्षांच्या लागवडीची मागणी

शीतल पाटील ल्ल सांगलीप्रचंड आकार असणाऱ्या, दाट सावली देणाऱ्या आणि दीर्घायुष्य असलेल्या वटवृक्षावरच आता संक्रांत येऊ लागली आहे. शहरातील रस्ता रुंदीकरणात सुमारे ५० हून अधिक वडाची झाडे तोडली गेली आहेत. आणखी तोडली जाणार आहेत. एक-दोन पिढ्यांच्या वाटचालीचे आणि अनेक घटनांचे साक्षीदार असलेले वटवृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वटवृक्षाचे महत्त्व केवळ वटपौर्णिमेलाच आहे असे नाही. शहर असो अथवा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी वडाची डेरेदार झाडे गावाची शोभा वाढवित असतात. उन्हाळा, पावसाळ्यात नागरिकांवर प्रेमाची सावली टाकत असतात. वटपौर्णिमेला तर वडाच्या झाडाला मोठे महत्त्व असते. हे झाड पुरातन काळापासून पूजनीय मानले जात आहे. या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात. चिरंतन संसार आणि सातजन्मीच्या बंधनासाठी याच वृक्षाला साक्षीदार मानून पूजले जाते. भावनांचे धागे या वृक्षाशी बांधले जात असतानाच प्रगतीच्या पावलांनी त्याच्यावर संक्रांतही आणली जात आहे. दळणवळणाच्या साधनांवर शहरांच्या प्रगतीचा आलेख मांडला जात आहे. नागरी सुविधांच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका पोहोचत आहे. सांगली शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झाडांची संख्या प्रचंड आहे. अनेक वर्षांच्या दळणवळणाचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण काळाच्या ओघात रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज ओळखून काही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे झाडावर संक्रांत आली आहे. त्यात वटवृक्षांचाही समावेश आहे. सांगली-कोल्हापूर रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर २० हून अधिक वडाची झाडे होती. त्यातील बहुतांश झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रस्त्याच्या रुंदीकरणात २ वडाची झाडे येतात. ती तोडण्याची परवानगी महापालिका व वृक्ष प्राधिकरणाने दिली आहे. माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर ते जकात नाका या रस्त्यावरही २५ वडाची झाडे आहेत. हे वटवृक्ष तोडण्यास वन विभागाने परवानगी दिली आहे. अद्याप महापालिकेची परवानगी मिळालेली नाही. त्यात रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने अजूनही नागरिक, वाहनधारकांच्या पाठीशी सावलीप्रमाणे हे वटवृक्ष उभे असल्याचे दिसत आहे.