शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

कुपवाड एमआयडीसीने वीस एकर जागा घेतली ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:49 IST

औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देउर्वरित उद्योजकांना चार दिवसांत अंतिम नोटिसा छोट्या उद्योजकांना जागा देण्याची उद्योग आघाडीची मागणीउर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरूबदनामी नको म्हणून जागा दिल्या स्वत:हून ताब्यातएमआयडीसीच्या रडारवर माजी मंत्र्याची जागा

कुपवाड, दि. १३ :  औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे. उर्वरित उद्योजकांना येत्या चार दिवसांत अंतिम नोटिसा देणार आहे, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

कुपवाड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या वसाहतीमधील दहा टक्के जागा वनीकरणासाठी राखीव ठेवली होती. त्यानुसार कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील अंदाजे ६२ एकर जागेवर वनीकरण व्हावे, या उद्देशाने शासनाने १९ विविध संस्थांना या भूखंडाचे वाटप केले होते. त्यावेळी संबंधित संस्थांनी या जागेवर शंभर टक्के वनीकरण करण्यची हमी देऊन काही वर्षासाठी करार करून भूखंड ताब्यात घेतले होते.

परंतु या १९ भूखंडधारकांनी त्या जागेवर बांधकाम करून शासनाच्या मूळ उद्देशाचे उल्लंघन केल्याचे एमआयडीसीच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व १९ भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानुसार अधिकाºयांनी १९ भूखंडांपैकी सध्या ५ भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

आतापर्यंत सुमारे वीस एकर जागा महामंडळाने ताब्यात घेतली आहे. यातील काही जणांना येत्या चार दिवसात अंतिम नोटिसा दिल्या जाणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी दुपारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक विभागाच्या अधिकाºयांनी कुपवाड एमआयडीसीतील सूरज स्पोर्टस्च्या रा. म. यादव क्रीडा मैदानाची मोजणी केली. हा भूखंड शासनाने या संस्थेला मैदानासाठी दिला होता. परंतु संबंधित संस्थेने या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याने या संस्थेलाही एमआयडीसीने नोटीस दिलेली आहे.

या संस्थेने या जागेसाठी शासनाकडे नूतनीकरणाचा अर्ज सादर केला होता. परंतु, या जागेवर संस्थेने विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम केल्याने सांगली विभागीय कार्यालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

ही जागा ताब्यात घेण्यासाठी सांगली विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला असून, या प्रस्तावात संबंधित संस्थेने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून येणाºया आदेशानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील वनीकरणासाठी दिलेले प्लॉट औद्योगिक विकास महामंडळाने काढून घेतले आहेत. यापैकी दहा टक्के वनक्षेत्र राखीव ठेवून उर्वरित भूखंडाचे प्लॉट पाडून त्यांचे छोट्या गरजू उद्योजकांना वाटप करावे, अशी मागणी उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, चंद्रकांत पाटील, शशिकांत मसुटगे यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे केली आहे. ज्या जागा काढून घेतल्या आहेत, त्यावर एमआयडीसीच्या नावाचे फलक लावावेत, अशी मागणी उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष चौगुले यांनी केली आहे.

जागा दिल्या स्वत:हून ताब्यातकुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये वनीकरणासाठी घेतलेल्या भूखंडाबाबत वातावरण ढवळून निघाले आहे. एमआयडीसीने गैरवापर करणाºयांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर बदनामी नको, म्हणून एका संस्थेने आपल्याकडील दोन भूखंड स्वत:हून एमआयडीसीच्या ताब्यात दिले आहेत, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.एमआयडीसीच्या रडारवर माजी मंत्र्याची जागाएमआयडीसीने वनीकरणासाठी दिलेल्या जागांची तपासणी केली आहे. संबंधित संस्थांनी शासनाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून या भूखंडांवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. संस्थांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांच्या यादीत एका माजी मंत्र्याच्या संस्थेचे नाव असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे या माजी मंत्र्याच्या भूखंडावरही पुढील टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :forestजंगलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार