शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड पाणी बिल घोटाळ्याची चौकशी होणार, सांगली महापालिका प्रशासनाकडून हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:45 IST

नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर कार्यवाही

सांगली : कुपवाडमधील काही उपनगरात नागरिकांनी पाणीबिलापोटी पैसे घेऊन महापालिकेत भरणा केला नसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत काही नागरिक तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत. संबंधिताच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाणीपट्टी विभागाने याची दखल घेत प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे.दोन ते तीन वर्षापूर्वी महापालिकेत पाणी बिल घोटाळा चांगलाच गाजला होता. उपनगरे, विस्तारित भागात बोगस पाणी कनेक्शन देण्यात आली होती. तसेच काही नागरिकांकडून पैसे घेऊन त्याचा महापालिकेत भरणा करण्यात आला नव्हता. हे प्रकरण उजेडात येताच महापालिकेत खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने बोगस कनेक्शनच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमत १९६ बोगस कनेक्शन मिळून आली. प्रशासनाने ही कनेक्शन नियमित केली. या घोटाळ्याचा ठपका घेऊन एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा विस्तारित भागात हाच प्रकार समोर आला आहे. याबाबत नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांच्याकडे काही नागरिकांंनी तक्रारी केल्या. नवीन पाणी बिल आल्यानंतर त्यात थकबाकी दिसून आल्याने नागरिकही हादरले आहेत. त्याची दखल घेत पाणीपट्टी विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. नागरिकांच्या प्रत्यक्षात तक्रारी आल्यानंतर चौकशीला गती येईल, असे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी कराचा भरणा महापालिकेतच करावा. पैसे कर्मचाऱ्याकडे दिले तरी त्याच्याकडून पावती घ्यावी, असे आवाहन केले आहे.

९० हजाराचे बिलएका ग्राहकाचे पाणी कनेक्शन व्यावसायिकवरून घरगुती करून घेतले होते. तरीही त्याला ९० हजाराचे पाणी बिल आहे. काही नागरिकांना थकबाकीसह बिले आली आहेत. मागील घोटाळ्याप्रमाणेच हा प्रकार दिसत असल्याचे नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितले.