शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

कृष्णप्रकाश यांचा जयंतरावांवर निशाणा

By admin | Updated: June 18, 2016 00:14 IST

फेसबुकवर पोस्ट : लॉटरी घोटाळ्यातून वादाचा दुसरा अंक; सांगलीतील उट्टे काढण्याचा प्रयत्न

सांगली : लॉटरी घोटाळ्यात माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील यांच्यावर माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्र्णी यांनी थेट आरोप केल्यानंतर आता विशेष पोलिस महानिरीक्षक व सांगलीचे तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी निशाणा साधला आहे. ‘लॉटरी घोटाळा राज्यातील जनतेसमोर आल्याचं समाधान वाटतं’, अशी पोस्ट कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकून लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलही दिला आहे. यातून त्यांनी सांगलीतील उट्टे पुरेपूर काढण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णप्रकाश २००६ ते २००९ या काळात सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख होते. या काळात त्यांचे जयंत पाटील यांच्याशी अनेकदा वाद झाले होते. सप्टेंबर २००९ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला मिरजेत दंगल उसळली होती. या दंगलीचे लोण सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही पसरले होते. त्यावेळी जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद होते. दंगलीच्या तपासादरम्यान कृष्णप्रकाश यांनी सूत्रधारापर्यंत माग काढल्याचा दावा केला होता. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर दिवंगत आर. आर. पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद गेले. त्यांचे कृष्णप्रकाश यांना पाठबळ होते. मात्र, कार्यकाळ पूर्ण होताच कृष्णप्रकाश यांची बदली झाली. बदली होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून, मिरजेतील दंगलीचा सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान असल्याचा गौप्यस्फोट केला होता. बागवान हे जयंत पाटील यांच्या अत्यंत निकटचे कार्यकर्ते असल्याने कृष्णप्रकाश यांनी जाता-जाता दंगलीच्या सूत्रधाराचे नाव जाहीर करून पाटील यांना धक्का दिला होता. मात्र कृष्णप्रकाश यांनी राजकीय हेतूने बागवान यांचे नाव गोवल्याचा दावा पाटील यांनी केला होता.चार दिवसांपूर्वी माजी सनदी अधिकारी कुलकर्णी यांनी जयंत पाटील यांच्यावर लॉटरी घोटाळ्याबाबत आरोप केला होता. त्यावर राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, शुक्रवारी कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणात उडी घेतली. सांगलीत पोलिसप्रमुख असताना पाटील यांच्याशी उडालेल्या खटक्यांचे उट्टे त्यांनी यातून पुरेपूर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. वादाची ठिणगी पडलीजयंत पाटील यांच्याकडे २००९ मध्ये आठ महिने गृहमंत्रिपद होते. त्या काळात कृष्णप्रकाश सांगलीत होते. एकेकाळचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड व राष्ट्रवादीचा नगरसेवक दाद्या सावंत नेहमी पाटील सांगलीत आले की, त्यांच्यासोबत असे. एकदा पाटील पोलिस मुख्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी ते कृष्णप्रकाश यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळीही दाद्या सावंत त्यांच्यासोबत तेथे गेला होता. ही बाब कृष्णप्रकाश यांना खटकली होती. तेथूनच पाटील व कृष्णप्रकाश यांच्यात वादाची ठिणगी पडली. गृहमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी दाद्या सावंतला कृष्णप्रकाश यांच्या कार्यालयात नेल्याबाबत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे बोट करून मुंडे यांनी, ‘कदमसाहेब, दाद्या सावंत कोण आहे?’ असा प्रश्न केला होता. त्यावर पतंगरावांनी तो गुंड असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. (प्रतिनिधी)कृष्णप्रकाश यांची पोस्टआॅनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन झाले आहे, असा दावा सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टद्वारे केला आहे. लॉटरी किती अंकी असावी, याचेही बंधन पाळले नसून, लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलच त्यांनी या पोस्टवरून दिला आहे. कृष्णप्रकाश बुलडाण्याचे पोलिसप्रमुख असताना त्यांनी या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, पण त्यानंतरही शासनाने हा घोटाळा दडपून टाकला, असा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केला आहे.