शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:07 IST

कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव.

ठळक मुद्दे हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉलप्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच साडेतीन हजार लोकांना काढले बाहेर

शरद जाधव भिलवडी : कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव.भुवनेश्वरवाडी (भिलवडी, ता. पलूस) हे त्याचे गाव. कृष्णा नदीच्या महापुरात या पठ्ठ्याने भिलवडी, धनगाव, भुवनेश्वरवाडी या गावातील साडेतीन हजार लोकांना प्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच बाहेर काढले. तरुणांच्या मोबाईलवर, फेसबुकच्या पोस्टवर, स्टेटसवर त्याची छबी झळकू लागली. कृष्णा नदीपात्रात नाव चालविणारा हा नावाडी कृष्णाकाठचा आयडॉल बनला.काडीकाडी गोळा करून उभारलेला स्वत:चा संसार, घर पाण्यात बुडाल्याची जखम बाजूला ठेवली. कुणाला फोन लावावा तर पाण्यात मोबाईल बुडाल्याने संपर्कच नाही. कोणी सांगायचे, हार्ट पेशंट आहे, बीपी, शुगर वाढली, पुराचं पाणी वाढलं, म्हातारी माणसं दम काढनाती... असे निरोप आले की नितीन सांगितलेल्या जागेवर हजर. माणसे सुरक्षित बाहेर पडली की, मिठ्ठी मारायची, हाता-पाया पडायच्या. आयाबाया ढसाढसा रडायच्या.सुटलो एकदाचे या संकटातून म्हणून त्यांनी कृष्णामाईला हात जोडले की, त्यांच्या डोळ्यातून आसवे गळायची.. आपण करत असलेल्या नावाड्याच्या सेवेचे सार्थक झाल्याचं समाधान लाभायचं.

आंबकरी दादा म्हणजे नीतीनचे चुलते बापू आप्पा गुरव यांनी ७० वर्षे भुवनेश्वरवाडी ते औदुंबर अशी काठीच्या नावेतून भाविकांना आल्याड-पल्याड करण्याची सेवा केली. त्यांच्या पश्चात नितीनने १९९१ मध्ये नावेचा सुकाणू हाती धरला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेऱ्या सुरू. २००८ पासून वल्हे गेले नी यांत्रिक बोटीचा हँडल हाती आला. २००५ च्या महापुरात वल्ह्याच्या नावाने दोन हजार माणसे बाहेर काढली.२००६ च्या महापुरात तर एनडीआरएफच्या बोटी नव्हत्याच. या एकट्याने चार हजार माणसे बाहेर काढलेली. २०१९ चा महापूर मोठ्या प्रवाहाचा. यंदा साडेतीन हजार माणसे एकट्याने बाहेर काढली. हे काम करताना कधी स्वत: एखादी सेल्फी किंवा फोटो काढला नाही.

पाण्याच्या प्रवाहाची दिशा, धार कशी पडते, भोवरा कुठे आहे, बोटीच्या पंख्यात पाला कुठे अडकेल, हे त्याला पक्के माहीत आहे. बोटीत प्रमाणापेक्षा जादा भरती केली की, धोका झालाच म्हणून समजा. नितीन नेहमी या गोष्टीची दक्षता घेतो. बोटीत माणसे किती भरली यापेक्षा ती सुरक्षित बाहेर कशी काढता येतील याला नावाड्याने महत्त्व द्यावे,असे तो म्हणतो.यंदा महापुरात प्रशासनाने चौथ्या दिवशी बोटीची सोय केली. प्रत्येक गावाला यांत्रिक बोटी द्याव्यात, तरुण पिढीला आपण बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासही पुढाकार घेणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या शौर्याची दखल घेत भिलवडी ग्रामपंचायत, सर्व संस्था, भिलवडी पोलिसांनी यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनी गावातील ध्वजारोहण करण्याचा सन्मान नितीन गुरवला दिला. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली