शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

‘कृष्णा’ गिळतेय जमिनी --: बोरगाव परिसरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:16 IST

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता.

ठळक मुद्देशेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत,

बोरगाव : महापुराने कृष्णा नदीकाठावरील शेकडो एकर जमीन खचून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन बनण्याची भीती आहे. यात प्रामुख्याने बोरगाव, ताकारी, बहे, रेठरेहरणाक्ष, मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, साटपेवाडी, बनेवाडी, गौंडवाडी या गावांचा समावेश आहे.

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता. बघता बघता कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली. सलग तेरा दिवस पडणाºया पावसामुळे कृष्णामाईलाही आपले अक्राळविक्राळ रूप दाखवावे लागले. बघता बघता पुराचे रूपांतर महापुरात झाले. हिरवागार किनारा जलमय झाला. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. घराबरोबर शेती तब्बल आठ दिवस पाण्याखाली गेली व होत्याचे नव्हते झाले.

आता पूर ओसरला, पण विदारक चित्र शेतकऱ्यांच्या नजरेत येऊ लागले. हिरवी पिके पिवळी पडल्याचे पाहून शेतकºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. हाता-तोंडाला आलेली पिके कुजून चाललेली पाहून शेतकºयांच्या डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले. बहे गावापासून जुनेखेडपर्यंतच्या ३० किलोमीटरचा कृष्णा नदीचा पट्टा खचून शेती ओसाड बनली. महापुराच्या पाण्याने पिकांबरोबर मातीही वाहून गेली. या पुराच्या पाण्याने फक्त मातीच नाही, तर दोन वर्षांचे अन्नधान्य वाहून शेतकºयांचे जीवनही वाहून नेले. अनेक शेतकरी तर या महापुराने भूमिहीन झाले.

शेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक शेतकºयांची शेती बंजर व नापीक बनली आहे. शासन या शेतकºयांना मोबदला देणार का? खचलेल्या मातीचे, जमिनीचे, पिकांचे काय करणार? ज्यांची जमीन राहिली नाही, त्यांनी कोणाच्या व कोणत्या मदतीची वाट पाहायची? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ते कधी सुटणार व शासन कशी मदत करणार, याकडे नदीकाठावरील शेतक-यांच्या नजरा लागून आहेत.अंतरिम : निर्णय शासन घेईलनदीकाठावरील खचलेल्या शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत लवकरात लवकर करू, जे शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन झालेत त्यांचे सर्वेक्षण करून शासनाला कळवू, मात्र हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने यावर अंतरिम निर्णय शासन घेईल, असे मत वाळवा तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदी