शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात खोकी पुनर्वसनास सत्ताधाऱ्यांचा कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:33 IST

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र देण्यात ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतासगावात खोकी पुनर्वसनास सत्ताधाऱ्यांचा कोलदांडाआर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार

दत्ता पाटील तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती, मात्र पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या विषयाला सोयीस्कर बगल देण्यात आली असून, ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, राज्याला धोरणात्मक निर्णयातून दिशा देणाऱ्या आबांचे स्मारक तासगावात असावे, अशी मागणी होत होती. त्यानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या आवारात आबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला.

बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस स्मारक उभारण्यात येत आहे. मात्र या स्मारकापुढे पालिकेच्या जागेवरील खोक्यांचा अडथळा ठरत आहे. या ठिकाणाहून खोकी काढून, अन्यत्र खोक्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बाजार समितीकडून निवेदनाद्वारे करण्यात आली होती.राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब सावंत आणि नगरसेविका प्रतिभाताई लुगडे यांनीही खोक्यांचे पुनर्वसन करण्याबाबत लेखी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेतही, आबांच्या स्मारकास अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती.

त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी त्या सभेत फक्त विषयपत्रिकेवरील विषयांवरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगत खोक्यांबाबतीत माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यावेळी नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी यापूर्वीच लेखी निवेदन दिले असून, पुनर्वसनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. मात्र भाजपकडून ही सभाच गुंडाळण्यात आली.नगराध्यक्षांनी गतवेळच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांनाच मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. बाजार समिती आणि राष्ट्रवादीकडून नगरपालिकेकडे खोकी पुनर्वसनाबाबत लेखी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह आबाप्रेमींसाठी स्मारकाचा विषय जिव्हाळ्याचा ठरणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या सभेत हा विषय अजेंड्यावर येईल, अशी अपेक्षा होती.नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी ३ जुलैरोजी होणाऱ्या सभेचा अजेंडा प्रसिध्द केला आहे. या अजेंड्यातून खोकी पुनर्वसनाचा विषय सोयीस्करपणे वगळण्यात आला आहे. विषयपत्रिकेवर विषय नसल्याने, खोकी पुनर्वसनाच्या विषयावरचा निर्णय लटकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने या निर्णयातून राजकीय कुरघोडी करण्यासाठी हा विषय वगळला असल्याची चर्चा होत आहे. या निर्णयाने आबाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत असून, राष्ट्रवादीकडून मात्र या निर्णयाविरोधात आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आबांच्या स्मारकाच्यानिमित्ताने भाजप विरुध्द राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभे ठाकणार का? याची उत्सुकता आहे.

टॅग्स :MarketबाजारSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका