शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे महापौरपद आव्हान म्हणून स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:11 IST

महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.- गीता सुतार

ठळक मुद्देजनतेचे मत जाणून घेऊन काम करणार

शीतल पाटील ।

राजकारणाशी कसलाही संबंध नसताना गीता सुयोग सुतार यांच्यावर अचानक महापालिका निवडणूक लढवावी लागली. दीड वर्षातच त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी भाजपने सोपविली. गृहिणी ते सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहराच्या महापौर असा त्यांचा प्रवास. या नव्या आव्हानाबाबत त्यांच्याशी केलेली बातचित

प्रश्न : राजकारणाशी संबंध कधी आला?उत्तर : माझे माहेर कवठेमहांकाळ. आमचे संपूर्ण कुटुंबच वारकरी. एक भाऊ पोलीस खात्यात नोकरीला. त्यामुळे कधी घरात राजकारणाचा विषयच निघत नव्हता. विवाहानंतर मी सांगलीत आले. सासरी मात्र राजकीय वातावरण होते, पण आपण राजकारणात येऊ, नगरसेविका होऊ, असे स्वप्न कधीच बघितले नव्हते. दीड वर्षापूर्वी अचानकच भाजपने मला प्रभाग १७ मध्ये उमेदवारी दिली. राजकारणातील ते पहिले पाऊल. तेव्हाही कुटुंबाने धीर दिला. पाठीशी राहिले. म्हणूनच नगरसेविका होऊ शकले. तसा राजकारणातील प्रवास दीड वर्षाचाच म्हणावा लागेल.

प्रश्न : महापौर होणार, असे कधी वाटले होते का?उत्तर : नगरसेविका, महापौर या पदाचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. पण भाजपच्या नेत्यांनी मोठ्या विश्वासाने महापौरपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करणार आहोत.

प्रश्न : विकासकामे, फायलींचा निपटारा याचे काय नियोजन केले आहे?उत्तर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. सांगलीची जनता व नगरसेवकही जागृत आहेत. या साऱ्यांना विश्वासात घेऊन शहराचा कायापालट करण्याचा मानस आहे. महापालिकेचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालून भरीव कामे करण्यावर भर आहे. भाजपने पारदर्शी कारभाराचे आश्वासन दिले आहे. त्याला बांधिल राहूनच काम केले जाईल.नदी प्रदूषण रोखणारकृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. नदीपात्रात मिसळणाºया शेरीनाल्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा विचार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन नियोजन केले जाईल. नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी देण्याचा मानस आहे.योजनांचा पाठपुरावामहापालिकेच्या ड्रेनेज, पाणीपुरवठा, घरकुल अशा अनेक योजना प्रलंबित आहेत. या योजना मार्गी लावून त्याचा लाभ जनतेला देण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.‘स्वच्छ सांगली, सुंदर सांगली’महापालिकेचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालून भरीव विकासकामे करण्यावर भर आहे. राज्य व केंद्राकडून निधी आणण्यासाठी आमदार, खासदारांची मदत घेतली जाईल. ‘स्वच्छ सांगली, सुंदर सांगली’चे स्वप्न बाळगले आहे.

टॅग्स :SangliसांगलीMayorमहापौर