सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या पानटपरीमध्ये येऊन दादागिरी करत चाकूच्या धाकाने सिगारेटसह अन्य माल लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अयाज ईलही जमादार (वय २९, रा. गणेशनगर, सांगली) याने फिर्याद दिली असून समर्थ भारत पवार व रोहित मधुकर गोसावी (रा. वाल्मीकी आवास, सांगली) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी अयाज जमादार याची बसस्थानकासमोर पानटपरी आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित दोघे तेथे आले व त्यांनी सिगारेट व काडेपेटी घेतली. जमादार याने त्याचे पैसे मागताच संशयितांनी चाकूचा धाक दाखवून दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जबरदस्तीने ३९० रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे काढून घेतली. पोलिसांनी माहिती मिळताच दोघांना अटक केली आहे.