शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

खरेदी व्यवहारातून किरवले यांची हत्या

By admin | Updated: March 5, 2017 00:21 IST

आरोपीची कबुली : मायलेकास अटक; बंगल्याच्या संचकारपत्रानंतर झाली वादावादी

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी मायलेकास शनिवारी अटक केली. संशयित प्रीतम गणपती पाटील (३०, रा. राजेंद्रनगर), त्याची आई मंगला गणपती पाटील (५५) अशी त्यांची नावे आहेत. डॉ. किरवले यांची बंगल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हत्या केल्याची कबुली संशयित प्रीतम पाटील याने दिली. त्याने गुन्ह्यात वापरलेला एडका (एक घातक शस्त्र) व दुचाकी पोलिसांनी जप्त केली. डॉ. किरवले यांचा राजेंद्रनगर येथे प्रशस्त दुमजली बंगला आहे. घरी ते व पत्नी असे दोघेच राहत होते. शुक्रवारी (दि. ३) राहत्या घरी त्यांची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. ही हत्या शेजारीच राहणारा प्रीतम पाटील याने आर्थिक व्यवहाराच्या वादातून केल्याचे त्याचा मित्र विजयसिंह राजपूत याने पोलिसांना सांगितले. संशयित पाटील हा पसार झाल्याने त्याला तत्काळ अटक करणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी बेळगाव, शाहूवाडी, मलकापूर, रत्नागिरी, हुपरी या ठिकाणी पथके रवाना केली. तो हाती आल्यानंतरच हत्येमागचे रहस्य उलगडणार होते. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी सीपीआर रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर ठिय्या मांडून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत किरवले यांचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित प्रीतम पाटील याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो शाहूवाडीमध्ये असल्याचे दिसून आले. पोलिसांना दुपारी तो शाहूवाडी-मलकापूर रस्त्यावरील एका पडक्या मंदिरात लपून बसलेला मिळून आला. त्याच्यासह दुचाकी (एम एच ०९ बीक्यू ८९१६) पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याला राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीचा कबुलीजबाब डॉ. किरवले आणि माझ्या वडिलांचे मैत्रीसंबंध असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांना बंगला दुसऱ्या कोणाला विकू नका, आम्हीच घेतो असे सांगितले. बाजारभावाप्रमाणे बंगल्याची किंमत ४६ लाख रुपये ठरली. मी नातेवाईक, मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन २६ लाख रुपये किरवले यांना दिले. उर्वरित २० लाख रुपये रजिस्ट्रेशन करताना द्यायचे ठरले. शुक्रवारी (दि. ३) दुपारी दस्त नोंदणी कार्यालयात मी, वडील व डॉ. किरवले असे तिघेजण गेलो. बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे संचकारपत्र केले. त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी आलो. किरवले यांनी मला व वडिलांना पुन्हा चार वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले. त्यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त रकमेची मागणी केली. यावरून आमच्यात शाब्दिक वादावादी झाली. वडील शेजारी परीट यांच्या घरी सुतारकाम असल्याने निघून गेले. त्यानंतर मी किरवले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पैसे वाढवून दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विचित्र स्वभावामुळे माझा राग अनावर होऊन झटापट झाली. यावेळी सोबत असलेल्या पिशवीतील धारदार एडका (शस्त्र) घेऊन मी त्यांच्या डोक्यात पहिला वार केला. त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी स्वयंपाकघरातून बेडरूममध्ये धावत आल्या. मी किरवले यांना धरून ठेवलेले पाहून त्यांनी माझ्या हाताच्या बोटांचा चावा घेतला. त्यावर हिसडा मारून त्यांना मी बाहेर ढकलले व रूमचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर किरवले हे माझ्या हातातून सुटून ओरडत धावत वर दुसऱ्या मजल्यावर गेले. त्यांच्या मागोमाग जाऊन मी त्यांचा गळा चिरला. ते मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तेथून मी पसार झालो. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयित प्रीतम पाटीलची आई घाईगडबडीने डॉ. किरवले यांच्या घरी आली. रक्ताने माखलेली कपडे बदलून मुलगा निघून गेल्याने ती बिथरली. पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात किरवले मृतावस्थेत पडलेले दिसले. हा प्रकार पाहून ती स्वयंपाकघरात आली. मुलाने ठेवलेली पिशवी घेऊन थेट घरी आली. पिशवीमध्ये रक्ताने माखलेली पॅँट व एडका असल्याने तिने ती पिशवी गटारीमध्ये फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एका-एकाला चिरून टाकीनडॉ. किरवले यांच्या हत्येनंतर संशयित प्रीतम पाटील याचे कपडे रक्ताने माखले होते. त्याने फोन करून आईला घरातून पॅँट आणण्यास सांगितली. आईने काही वेळातच पिशवीतून पॅँट आणून दिली. रक्ताने माखलेली पॅँट व एडका पिशवीत ठेवून ती स्वयंपाकघरातील कट्ट्यावर ठेवली. आईला ‘मी आता जातोय, ती पिशवी घेऊन घरी जा,’ असे सांगून तो बाहेर आला. किरवले यांच्या घरासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी त्याने मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर एका-एकाला चिरून टाकीन, अशी धमकी दिल्याने त्याला पकडण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तेथून घरी येऊन पत्नीला भेटून तो स्वत:ची दुचाकी घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.